Thursday, April 25, 2024
घरमानिनीPregnancy मध्ये एक ग्लास wine ही आहे धोकादायक

Pregnancy मध्ये एक ग्लास wine ही आहे धोकादायक

Subscribe

जगभरातील हेल्थ एक्सपर्ट नेहमीच प्रेग्नेंट महिलांना अल्कोहोल पासून दूर राहण्याचा सल्ला देतात. याच कारणामुळे मुलाला सुद्धा काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. नुकत्याच नेदरलँन्ड्स मधील इरासमस मेडिकल सेंटरच्या वैज्ञानिकांनी या विषयावर रिसर्च केला आहे. यामध्ये असे दिसून आले आहे की, एका आठवड्यात केवळ एक ग्लास वाइन प्यायल्याने ही मुलाच्या चेहऱ्यावर कायमचे बदल होऊ शकतात

3D इमेजिंगच्या माध्यमातून केला अभ्यास
या रिसर्चमध्ये वैज्ञानिकांनी ५ हजार ६०० शालेय मुलांच्या चेहऱ्याच्या २०० विशेषतांचा अभ्यास केला. असे ३डी इमेजिंग आणि डीप लर्निंग एल्गोरेदिमच्या सहाय्याने हे सर्वकाही साध्य झाले. या मुलांमध्ये काही मातांनी आपल्या प्रेग्नेंसी दरम्यान अल्कोहोलचे सेवन केले होते. तर काही दारु पासून दूर राहिल्या होत्या. रिसर्चच्या मते, एका आठवड्यात १२ ग्रॅम अल्कोहोल प्यायल्याने मुलाचा चेहरा स्थायी रुपात बदलू शकतो.

- Advertisement -

मुलांमध्ये बदल
रिसर्चर्सला अॅनालिसिसिसमध्ये असे दिसून आले की, गर्भधारणेनंतर थोडी जरी दारु प्यायल्याने मुलाच्या चेहऱ्यात काही प्रकारचे बदल दिसून येऊ शकतात. यामध्ये लहान नाक, डोळ्यांखाली खड्डे असे काही बदल. प्रेग्नेंट महिला जेवढे अल्कोहोलचे सेवन करेल तेवढाच खोल बदल हा मुलांमध्ये होतो. खासकरुन अशा मातांच्या मुलांवर जे प्रेग्नेंसी दरम्यान आणि तीन महिन्यांआधीपासून अल्कोहोलचे सेवन करायची.

- Advertisement -

मुलांना होऊ शकते फिटल अल्कोहोल स्पेक्ट्रम डिसऑर्डर
प्रेग्नेंसी दरम्यान अल्कोहोलचे सेवन केल्याने मुलांना अल्कोहोम स्पेक्ट्रम डिसऑर्डर होण्याची शक्यता असते. यामुळे चेहऱ्यासह डोक्यावर ही परिणाम होतो. तो मानसिक रुपात कमजोर होऊ शकतो. त्याच्या वागणूकीत समस्या ही उद्भवू शकतात. यामुळेच महिलांनी प्रेग्नेंसी दरम्यान गर्भात असलेल्या मुलाच्या सुरक्षिततेसाठी अल्कोहोल पासून दूर रहावे असे सांगितले जाते.

यापूर्वी झालेल्या एका रिसर्चनुसार प्रेग्नेंसीमध्ये प्रत्येक आठवड्याला ७० ग्रॅम दारु प्यायल्याने मुलावर होणाऱ्या प्रभावाबद्दल अभ्यास केला गेला. यामध्ये सुद्धा असेच काहीसे परिणाम दिसून आले. तज्ञांच्या मते, अल्कोहोल कितीही प्रमाणात प्रेग्नेंसी दरम्यान प्यायल्याने त्याचा मुलावर परिणाम होतोच.


हेही वाचा: Post Pregnancy नंतर वाढलेले वजन असे करा नियंत्रित

- Advertisment -

Manini