हिवाळा ऋतू सुरू झालेला असून या काळात वातावरणात अनेक बदल होत असतात. तसेच वातावरणासह आपल्या शरीरात देखील अनेक बदल घडत असतात. हा ऋतू मानसिक आरोग्यावरही प्रभाव टाकतो.बदलत्या वातावरणामुळे आपला मूड, एनर्जी झोपेची पद्धत आणि एकूण आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. नैराश्याची समस्या निर्माण होऊ शकते.
सीजनल अफेक्टिव डिसऑर्डर (एसएडी)
सीझनल इफेक्टिव्ह डिसऑर्डर म्हणजे, सीझनल डिप्रेशन, ज्याला सीझनल इफेक्टिव्ह डिसऑर्डर (एसएडी) देखील म्हणतात, हा नैराश्याचा एक प्रकार आहे. वातावरणातील बदलांमुळे ही समस्या निर्माण होते. हिवाळ्यात या प्रकारची समस्या लगेच उद्भवूते.
- या ऋतूमध्ये दुःखाची भावना निमार्ण होते.
- एकटेपणा जाणवतो
- आपल्या मूडमध्ये बदल घडतात
- काम करायचा उत्साह वाटत नाही
- जास्त झोपणे आणि वजन वाढणे
सीजनल अफेक्टिव डिसऑर्डर लक्षणे
मूड स्विंग्स किंवा थकवा
हिवाळ्यात दिवस लहान असतो, त्याचबरोबर सूर्यप्रकाश देखील कमी असतो. सुर्प्रकाशामुळे आपल्यामध्ये उत्साह, ऊर्जा निर्माण होते. हिवाळ्यात दिवस लहान असल्यामुळे मूड स्विंग्स आणि थकवा निर्माण होंतो.
नकारात्मक विचार करणे
सूर्यप्रकाश कमी झाल्याने मेंदूमध्ये सिरोटोनिनची पातळी कमी होऊ शकते. सिरोटोनिन हा मूड नियंत्रित करणारा रसायन आहे, याची कमतरता कमी झाली. आपल्यामध्ये डिप्रेशनचे प्रमाण वाढते.
उत्साह पूर्णपणे निघून जाणे
वारंवार वातावरणात बदल होत असल्यामुळे आपल्या मूडमध्ये बदल घडतात. काम करायचा उत्साह पूर्णपणे निघून जातो. तसेच दुःखाची भावना निमार्ण होते.
हिवाळ्यात आपल्या मानसिक आरोग्याची काळजी अशी घ्या
जास्तीत जास्त सूर्यप्रकाश घ्या
घराबाहेर पडणे किंवा खिडकीतून सूर्यप्रकाशात जाणे यामुळे तुमच्या शरीरातील सेरोटोनिनची पातळी वाढते, ज्यामुळे तुमचा मूड संतुलित राहतो.
नियमित व्यायाम करा
थंड हवामानात बरेच लोक व्यायाम करायला कंटाळा करतात. त्यामुळे नियमित काही वेळ व्यायाम करा, कंटाळा करू नका.
विश्रांती घ्या
शरीराला विश्रांतीची देखील गरज असते . त्यामुळे जास्तीत जास्त विश्रांती घ्या.
डॉक्टरांचा सल्ला घ्या
जर तुम्हाला, भूक लागत नसेल किंवा मूडमध्ये देखील वारंवार बदल होत असतील. काम करायचा उत्साह वाटत नसेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला देखील घेऊ शकता.
हेही वाचा : Health Tips : टॉयलेटमध्ये १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसणे धोकादायक
Edited By : Prachi Manjrekar