Sunday, December 15, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीBeautyWinter Beauty Tips : हिवाळ्यात वॅक्सिंग करताना घ्या ही काळजी

Winter Beauty Tips : हिवाळ्यात वॅक्सिंग करताना घ्या ही काळजी

Subscribe

हिवाळा ऋतू म्हणजे गोडगुलाबी थंडीचा दिवस. परंतु या ऋतूमधील थंडी त्वचेला ड्राय करते. ज्यामुळे त्वचा पांढरी आणि निस्तेज दिसू लागते. अशात आपण अनेक मॉइश्चरायझर्सचा वापर करतो. तर काही वेळेस अशा काही गोष्टी आपण त्वचेला लावतो. ज्यामुळे त्वचा मुलायम होऊ शकेल. पण याचा त्वचेवर कोणताच परिणाम होत नाही. त्वचा अधिकच खराब दिसू लागते, जेव्हा आपण वॅक्सिंग करतो. यात नको असलेले केस काढून टाकले जातात. ज्यामुळे स्किन अधिकच ड्राय होऊ लागते. अशावेळी वॅक्सिंग करताना काही खास गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. जेणेकरून हातापायांवर जास्त ड्रायनेस दिसणार नाही.

त्वचेला आधी मॉइश्चरायझ करा :

- Advertisement -

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते. असं यामुळे कारण हिवाळ्यात त्वचेतील नरमपणा वातावरणाद्वारे शोषून घेतला जातो. अशात जर तुम्ही वॅक्सिंग केलं तर ड्रायनेस तुम्हाला जास्त दिसू लागेल. यासाठी त्वचेला आधी मॉइश्चराझ करुन घेणं गरजेचं आहे. तु्म्ही रोज तुमच्या चेहऱ्यावर अॅलोवेरा जेल किंवा कोको बटर लावू शकता. या दोन्ही गोष्टींपासून तुम्ही घरच्या घरीच मॉइश्चरायझर बनवू शकता. यामुळे स्किन फाटणार नाही आणि त्वचा मुलायमही राहू शकेल.

प्री- वॅक्स स्क्रबचा करा वापर :

वॅक्सिंग करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या त्वचेवर हलकेच स्क्रबही करू शकता. ज्यामुळे त्वचेवरील डेड स्किन सेल्स निघून जातील. यानंतर जेव्हा तुम्ही वॅक्सिंग कराल तेव्हा तुम्हाला स्किन सॉफ्ट वाटू लागेल. यासाठी तुम्ही बाजारात सहज उपलब्ध होणारे स्क्रब्सही वापरू शकता. यामुळे तुम्हाला वॅक्सिंग करणे सोपे जाईल.

- Advertisement -

वॅक्सिंग केल्यावर घाला लूज कपडे :

जास्त घट्ट कपडे तुमच्या त्वचेला नुकसान पोहचवू शकतात. यासाठी लूज कपडे घालणं फायदेशीर ठरू शकतं. असं यासाठी कारण यामुळे तुमच्या स्किनवर कोरडेपणा राहणार नाही. व त्वचेवर ड्रायनेसमुळे येणारा रेडनेसही निघून जाईल.

हेही वाचा : Freak Matching Relationship : तरुणाईमध्ये फ्रीक मॅचिंग रिलेशनशिपचा ट्रेंड


Edited By – Tanvi Gundaye

- Advertisment -

Manini