Friday, January 24, 2025
HomeमानिनीChild Health : थंडीत मुलांना द्यावेत हे पौष्टिक पदार्थ

Child Health : थंडीत मुलांना द्यावेत हे पौष्टिक पदार्थ

Subscribe

थंडीत आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. या दिवसात वायरल इन्फेक्शनचा धोका अधिक असतो. लहान मुलांना वायरल इन्फेक्शन लगेच होते. त्यामुळे या दिवसात मुलांना निरोगी ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे आवश्यक असते. जाणून घेऊयात, मुलांना कोणते पौष्टिक पदार्थ द्यायला हवेत.

बाजरी –

बाजरीचा समावेश मुलांच्या आहारात करायला हवा. बाजरीमध्ये ऍटी-ऑक्सिडंट मुबलक प्रमाणात आढळतात. बाजरीच्या सेवनाने शरीरात उब निर्माण होते. त्यामुळे थंडीच्या दिवसात आवर्जुन बाजरीचे पदार्थ खाण्याचा सल्ला तज्ञ देतात.

हळदीचे दूध –

मुलांना पौष्टिकतेने परिपूर्ण असे हळदीचे दूध प्यायला द्यावे. हळदीत अनेक पोषकतत्त्वे आढळतात. हळदीचे दूध प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.

हिरव्या पालेभाज्या –

हिरव्या पालेभाज्या थंडीच्या दिवसात मुलांना खायला द्याव्यात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये आयर्न, फोलेट आढळते. तज्ञांच्या मते, हिरव्या पालेभाज्यांच्या सेवनाने मेंदू तंदूरुस्त राहतो. मुले हिरव्या पालेभाज्या खायचा कंटाळा करत असतील तर भाज्यांचे सूप, पराठे बनवून मुलांना देता येतील.

तिळ –

तिळात भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळते. याच्या सेवनाने हाडांचे आरोग्य सुधारते आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो. तिळापासून तिळाची पोळी, लाडू बनवता येतील.

रताळे –

रताळे शरीरासाठी फायदेशीर असतात. यात व्हिटॅमिन ए आढळते, जे डोळ्यांचे आरोग्यासाठी उपयुक्त असते. त्यामुळे मुलांना जर चष्मा असेल रताळी अवश्य खायला द्यावीत.

तूप –

तूपाचा थंडीच्या दिवसात आहारात समावेश करावा. तुपातील व्हिटॅमिन्स शरीर उबदार ठेवतात. तुपाच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते. तुम्ही लहान मुलांना तूपातील पदार्थ खायला देऊ शकता.

आवळा –

आवळ्यात व्हिटॅमिन सी, ऍटी-ऑक्सिडंट मुबलक आढळतात. आवळ्याच्या या गुणधर्मामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि थंडीच्या दिवसात होणाऱ्या वायरल इन्फेक्शनपासून शरीराचे संरक्षण होते.

गाजर –

थंडीच्या दिवसात गाजर अवश्य खायला हवा. यातील व्हिटॅमिन ए शरीरासाठी फायदेशीर ठरतो. रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी मुलांना गाजराचे पदार्थ खायला द्यावेत. तुम्ही सॅलेडही देऊ शकता.

मुळा –

मुळ्यामध्ये ऍटी-ऑक्सिडंट आढळतात. पण, मुळा म्हटले की, लहान मुलांचा नाक मुरडली जातात. अशावेळी तुम्ही मुलांना टिफिनमध्ये मुळा फ्रॅंकी, पराठे देऊ शकता. मुळ्याच्या सेवनाने श्वसनाशी संबधित समस्या जाणवत नाही.

 

 

 

 

 

हेही पाहा –


 

Manini