घरलाईफस्टाईलकूल कूल थंडीत प्या हॉट लसणाचं सूप

कूल कूल थंडीत प्या हॉट लसणाचं सूप

Subscribe

हिवाळा म्हटलं की सर्दी खोकला आलाचं. कारण वातावरण बदललं की त्याचा परिणाम शरीरावर होतोच. त्यातच जर तुमची रोगप्रतिकारकशक्ती कमी असेल तर इतरांच्या तुलनेत तुम्हांला वातावरणातील बदलांचा सर्वाधिक त्रास होऊ शकतो. यामुळे यादिवसात रोगप्रतिकारकशक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन आवर्जुन करावे. त्यातही या सिझनमध्ये बाजारात मिळणाऱ्या फळे, भाज्यांचा आहारात समावेश करावा. त्यातही सूप हे कुठल्याही ऋतूमध्ये पिणे फायदेशीर आहे. हिवाळ्यात लसणाचं सूप अवश्य प्यावे. लसूण उ्ष्ण असल्याने थंडीत लसणाचं सूप पिल्यास सर्दी खोकला , सांधेदुखीपासून आराम मिळतो.

साहीत्य- दोन चमचे आलं लसूण बारीक चिरलेले, दोन चमचे गाजराचे बारीक तुकडे, दोन चमचे हिरवा वाटाणा, दोन चमचे मक्याचे दाणे, दोन चमचे बारीक चिरलेला कोबी. याशिवाय तुम्हांला आवडणाऱ्या भाज्याही तुम्ही यात टाकू शकता. एक चमचा तेल, चवीपुरते मीठ, १ चमचा कॉर्न फ्लॉवर, १ चमचा ठेचलेला लसूण.

- Advertisement -

कृती-सर्वप्रथम एका पॅनमध्ये तेल गरम करुन घ्या. नंतर त्यात आलं लसून टाका. गाजर, वाटाणा, मक्याचे दाणे,कोबी टाका. चांगल परतून घ्या. यात चिकनही टाकू शकता. सर्व मिश्रण परतून घ्या. नंतर त्यात पाणी टाका. ठेचलेला लसूण टाका. हे मिश्रण भाज्या शिजेपर्यंत चांगल उकळवून घ्या.त्यात कॉर्न फ्लॉवर टाका. गरमा गरम वाढा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -