हिवाळ्यात जेव्हा कधी बाहेर जावंसं वाटतं तेव्हा काय घालावं आणि काय नाही हेच कळत नाही. तसं पाहायला गेलं तर थंड हवामानातही, आपल्याकडे स्टायलिंग पर्याय कमी नाहीत. पण तुम्ही तुमच्या आउटफिटसोबतच ॲक्सेसरीजकडेही तितकेच लक्ष देणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही हिवाळ्यातील पोशाखांसह स्टेटमेंट ॲक्सेसरीज स्टाईल करता तेव्हा तुमचा लूक पूर्णपणे पार्टीसाठी तयार दिसतो.
हिवाळ्यात महिला अनेकदा त्यांच्या आउटफिटसोबत चुकीच्या ॲक्सेसरीज वापरतात, ज्यामुळे त्यांचा लूक बिघडू शकतो तर योग्य ॲक्सेसरीजमुळे तुमची स्टाईल अनेक पटींनी सुधारू शकते. हिवाळ्यातील पोशाखांप्रमाणे, आपल्याकडे ॲक्सेसरीजमध्येही पर्यायांची कमतरता नाही. तर, आज या लेखात आपण जाणून घेऊयात की हिवाळ्यातील पार्टीमध्ये तुम्ही तुमच्या आउटफिटसोबत कोणत्या प्रकारच्या स्टेटमेंट ॲक्सेसरीज स्टाईल करू शकता याविषयी.
चंकी नेकलेस :
हिवाळ्यात आपल्याला अनेकदा साधे कपडे घालायला आवडतात. जर तुमचा आऊटफिट प्लेन असेल, त्यावर फार नक्षीकाम नसेल तर किंवा तुमच्या आउटफिटमध्ये साधी नेकलाइन असेल, तर चंकी नेकलेस नक्कीच तुमचा लूक खूप खास बनवू शकतो. नेकलेस स्टाईल करण्याची पद्धत तुमच्या पोशाखाच्या लूकवर अवलंबून असायला हवी. उदाहरणार्थ, जर तुम्ही टर्टलनेक किंवा साधा स्वेटर ड्रेस घातला असेल तर त्याच्यासोबत लेयर्ड चेन किंवा बिब-स्टाईल नेकपीस स्टाईल करता येऊ शकतो. जेव्हा तुम्ही चंकी नेकलेस घालता तेव्हा बाकीच्या ॲक्सेसरीज हलक्या ठेवाव्यात, जेणेकरून तुमचा लूक अधिक चांगला होऊ शकेल.
बोल्ड इयररिंग्स :
हिवाळ्यातील आउटफिटमध्ये पार्टी लूकसाठी बोल्ड इयररिंग्स स्टाइल करणे देखील चांगली कल्पना असू शकते. जर तुम्हाला खूप हेवी ॲक्सेसरीज कॅरी करायची नसतील, पण त्याचवेळी स्टेटमेंट लूक तयार करायचा असेल, तर बोल्ड इअररिंग्ज स्टाइल करण्याचा विचार करू शकता. तुम्ही मोठ्या आकाराच्या हुप्सपासून ते झुमकेदार कानातल्यांपर्यंत वेगवेगळ्या डिझाइन्स ट्राय करू शकता. तुम्ही त्यांना हाय-नेक स्वेटरपासून ते स्लीक कपड्यांपर्यंत विविध आउटफिट्सवर परिधान करू शकता. हिवाळा ऋतू असल्याने, तुम्ही मेटॅलिक किंवा ज्वेल टोन कानातले घालण्याचा विचार करा. यात तुमचा लूक आणखी खास दिसेल.
स्टायलिश बेल्ट :
हिवाळ्यात तुमचा पोशाख स्टाईल करण्याचा आणि खास दिसण्याचा हा एक मार्ग आहे. जर तुम्हाला कमीत कमी अॅक्सेसरीज वापरायच्या असतील तर तुमच्या आउटफिटसोबत मोठ्या आकाराचा बेल्ट जोडा. तुम्ही मेटॅलिक बकल असलेल्या रुंद बेल्टने बेसिक स्वेटर-आणि-जीन्स लूक स्टाइल करू शकता. तुमच्या साध्या हिवाळ्यातील पोशाखात बेल्ट गेम चेंजर ठरू शकतो.
स्टेटमेंट रिंग :
जर तुम्ही चकचकीत आणि मोठ्या आकाराची अंगठी तुमच्या लुकचा भाग बनवली तर तुम्ही साध्या लूकमध्येही स्टायलिश दिसू शकता. ट्रेंडी पण क्लासी लूकसाठी मोठी कॉकटेल रिंग निवडा.
हेही वाचा : Kitchen Tips : घरी पॅनकेक बनवताना टाळाव्यात या चुका
Edited By – Tanvi Gundaye