हिवाळ्याच्या मोसमात, लोकांना बहुतेक वेळा वेस्टर्न आउटफिट्स स्टाईल करणे आवडते, परंतु लग्न किंवा कोणताही विशेष कार्यक्रम असेल तर मुली सर्वात जास्त साड्या नेसतात, त्यामुळे त्यांच्या वॉर्डरोब कलेक्शनमध्ये नक्कीच वेगवेगळ्या डिझाइनच्या साड्या असतात. पण हिवाळ्यात साडीला स्टाईल करणं थोडं कठीण होऊन बसतं कारण आपल्याला थंडीपासून वाचायचं असतं आणि फॅशन लूकही क्रिएट करायचा असतो. यासाठी तुम्ही साडीसोबत वेगवेगळ्या डिझाईन्सचे जॅकेट घालू शकता.
साडीच्या रंगाशी जुळणारे जॅकेट स्टाइल करा:
सुंदर दिसण्यासाठी तुम्ही बाजारातून साडीच्या रंगाशी जुळणारे जॅकेट खरेदी करू शकता आणि स्टाईल करू शकता, यामुळे तुमचा लूक खूप सुंदर दिसू शकेल.
तुम्ही तुमच्या जॅकेटला या कॉन्ट्रास्ट करून स्टाइल करू शकता. उदाहरणार्थ काळ्या रंगावर गुलाबी, हिरव्यासोबत पिवळा किंवा लाल, निळ्यासोबत केशरी इत्यादी. बाजारात तुम्हाला रेडिमेड डिझाइनमध्ये अशा प्रकारचे जॅकेट मिळतील. त्यामुळे तुम्ही ते रु. 1,000 ते रु. 1,200 मध्ये खरेदी करू शकता आणि कोणत्याही कार्यक्रमात साडीसोबत स्टाईल करू शकता.
लांब छापील जॅकेट स्टाईल करा :
जर तुम्ही प्लेन साडी नेसत असाल तर तुम्ही त्यासोबत लांब प्रिंटेड जॅकेटही स्टाईल करू शकता . या प्रकारचे जॅकेटसही तुम्हाला बाजारात सहज मिळू शकतील. जे तुम्ही साडीशी कॉन्ट्रास्ट करू शकता. यावर तुम्ही त्याच्यासोबत मॅच होऊ शकेल असा बेल्ट घालू शकता. यामुळे एक स्टाइलिश लूक क्रिएट होऊ शकेल. हे तुम्ही कोणत्याही लग्नात किंवा समारंभात घालू शकता. या प्रकारचे जॅकेट तुम्हाला बाजारात 2,000 ते 2,500 रुपयांना मिळेल.
साडीसोबत स्टाईल करा शॉर्ट जॅकेट :
जर तुम्हाला लांब जॅकेट घालायला आवडत नसेल, तर तुम्ही साडीसोबत शॉर्ट जॅकेटही स्टाईल करू शकता, यातही तुम्हाला प्रिंट आणि प्लेन अशा दोन्ही डिझाइन्स बाजारात सहज मिळतील. साडीच्या कलर कॉन्ट्रास्टनुसार ती खरेदी करा आणि स्टाईल करा. या प्रकारच्या जॅकेटसह, आपल्याला बऱ्याच ॲक्सेसरीज स्टाईल करण्याची आवश्यकता नाही. केवळ हे घातल्याने देखील तुमचा लूक चांगला दिसेल.
जेव्हा आपण योग्य ब्लाउज किंवा जॅकेट परिधान करतो तेव्हाच साडी खुलून दिसते. यामुळे आपला लूक हटके आणि वेगळा ठरतो. त्यामुळे स्वत:च्या बॉडी टाइपनुसार आणि कलर कॉम्बिनेशन नुसार परफेक्ट जॅकेट निवडण्याचा प्रयत्न करा.
हेही वाचा : Health Care Tips : हेल्दी आणि फिट राहण्यासाठी टिप्स
Edited By – Tanvi Gundaye