ऋतूमानानुसार, आपण आपला पोशाख नेहमीच बदलत असतो. थंडीत उबदार कपडे, उन्हाळ्यात सैलसर कपडे असे बदल आपण करतो. या कपड्यांप्रमाणेच फूटवेअर्स, अॅक्सेसरीज असेही बदल केले जातात. बाजारात सध्या हिवाळ्यासाठी अनेक ट्रेंडी फूटवेअर ऑप्शन्स उपलब्ध होऊ लागले आहेत. हे फूटवेअर्स वापरून तुम्ही तुमचा लूक अधिक ग्रेसफुल करू शकालच. पण सोबतच थंडीपासून पायांचे संरक्षणही करता येईल.
हाय बूट्स :
सुंदर दिसण्यासाठी तुम्ही हाय बूट्स घालू शकता. जीन्सपासून स्कर्टपर्यंत प्रत्येक आउटफिटवर हाय बूट्स चांगले दिसतात. शिवाय यामध्ये थंडीही कमी जाणवते. हे परिधान केल्याने तुमचा लूक चांगला दिसेल. यामध्ये तुम्ही मखमली डिझाइन केलेले बूट खरेदी करू शकता. अशा प्रकारचे बूट तुम्हाला बाजारात सहज मिळतील. ते परिधान केल्याने तुमचा लूक रॉयल दिसू शकेल. हे बूट्स तुम्हाला बाजारात 500 ते 1,000 रुपयांपासून मिळू शकतील.
प्रिंटेड ब्लॉक हिल्स :
कम्फर्टेबल राहण्यासाठी तुम्ही प्रिंटेड ब्लॉक हिल्स देखील घालू शकता . या हिल्स घातल्यानंतर यामध्ये उंचीही जास्त दिसते. तुम्ही हे कोणत्याही प्रकारच्या ड्रेससोबत परिधान करू शकता. तसेच, तुम्ही हे ऑफिसवेअर म्हणूनही कॅरी करू शकता. यामुळे तुमचा लूक चांगला दिसेल. तुम्हाला या प्रकारच्या ब्लॉक हिल्स बाजारात 1,000 ते 2,000 रुपयांना मिळू शकतील.
लोफर्स :
हिवाळ्यात तुमचे पाय झाकण्यासाठी तुम्ही लोफर्स देखील स्टाइल करू शकता . लोफर्स घातल्यानंतर पायांना कम्फर्टेबल फील मिळतो. यामध्ये तुम्हाला फॉर्मल ते कॅज्युअल डिझाईन्स मिळतील. यामुळे तुमचे पायही छान दिसतील. तुम्ही ते कोणत्याही पोशाखासोबत मॅच करू शकाल.
तुमच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी या सर्व प्रकारचे फूटवेअर्स तुम्ही स्टाईल करू शकता. यात तुम्हाला अनेक प्रकारच्या डिझाईन्स उपलब्ध होऊ शकतात.
हेही वाचा : Health Tips : लंच आणि डिनरमध्ये असावे इतक्या तासांचे अंतर
Edited By – Tanvi Gundaye