हिवाळा सुरू झाला आहे, त्यामुळे तुम्ही स्वत:साठी कम्फर्टेबल कपडे खरेदी करणे महत्त्वाचे आहे. या कपड्यांसोबतच योग्य आणि कम्फर्टेबल फूटवेअर परिधान करणंही आवश्यक आहे. जेणेकरून तुम्ही जिथे जाल तिथे थंडीमुळे तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये. यासाठी तुम्हाला बाजारात अनेक पर्याय मिळतील. पण वेगवेगळे कलेक्शन पाहिल्यानंतर, नेमके कोणते फूटवेअर निवडावेत याबद्दल खूप गोंधळ निर्माण होतो.
अशा परिस्थितीत, जाणून घेऊयात काही फूटवेअर्सबद्दल.
बूट घाला :
बदलत्या फॅशन ट्रेंडमुळे आजकाल प्रत्येकाला बूट घालायला आवडते. शॉट ड्रेस असो किंवा जीन्स, ते सर्वांसोबत स्टायलिश दिसतात आणि हिवाळ्यासाठी देखील खूप आरामदायक असतात. या हिवाळ्यात तुम्ही ते घालू शकता. यामध्ये तुम्हाला फ्लॅट बूट आणि हील्स असे दोन पर्याय मिळतील. यासोबतच लाँग आणि शॉर्ट्सचे पर्यायही पाहायला मिळतील. हे परिधान करून तुम्ही स्टायलिश दिसू शकता. या प्रकारच्या बुटांमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे रंग बाजारात मिळतील, ज्यांची किंमत 1000 ते 2000 रुपयांपर्यंत असेल.
स्नीकर्स घाला :
या हिवाळ्यात तुम्ही स्नीकर्स घालू शकता. ते खूपच कम्फर्टेबल आहेत आणि तुम्ही त्यांना ऑफिसमध्ये दररोज घालू शकता. यामध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाइन आणि कलर ऑप्शन्स मिळतील. ते परिधान करून तुम्ही तुमचा लुक कम्प्लिट करू शकता. यामध्ये तुम्हाला लेस असलेले शूज तसेच लेस नसलेले शूज मिळतील. तुम्हाला फक्त ते तुमच्या पायाच्या योग्य आकारानुसार खरेदी करायचे आहे आणि या हिवाळ्यात परिधान करायचे आहे.
बेली फूटवेअर्स :
जर तुम्ही ऑफिसला गेलात आणि हिवाळ्यात तुम्हाला आरामदायक असे काही घालायचे असेल तर तुम्ही यासाठी बेली ( ब्लॉक पंप फूटवेअर ) घालू शकता . सध्या त्यात खूप चांगल्या प्रिंट्स आणि डिझाइन्स मिळतात. ज्याला कोणत्याही आउटफिटसोबत स्टाइल करता येते. बाजारात विविध रंगांचे पर्यायही यात उपलब्ध असतात. हा प्रकार तुम्हाला 500 ते 1000 रुपयांना मिळेल.या हिवाळ्यात अशा सर्व प्रकारच्या फूटवेअर्सनी तुमचा लूक अधिक परिपूर्ण होईल आणि तुम्हाला थंडीही जाणवणार नाही.
हेही वाचा : Fashion Tips : ऑफिसच्या पार्टीसाठी अभिनेत्रींच्या या आऊटफिट आयडियास करा ट्राय
Edited By – Tanvi Gundaye