बदलत्या ऋतूमानानुसार , डोक्यावरील त्वचेत कोरडेपणा जाणवू लागतो. यामुळेच कोंड्याची समस्या निर्माण होते. तर काहीजणांच्या डोक्यावरील भागाच्या खपल्याही निघू लागतात. यापासून सुटका मिळवण्याकरता अनेकजण कोंडा कमी करणाऱ्या शॅम्पूचा वापर करण्याला प्राधान्य देतात. सोबतच काहीजण मेडिकल ट्रीटमेंटचाही आधार घेतात. परंतु यामुळे केसातील कोंड्याची समस्या कमी होत नाही. त्यामुळेच अशावेळी डोक्याचा पृष्ठभाग अर्थात स्कॅल्प खराब होऊ नये, त्याच्यावर कोंड्याचा थर जमा होऊ नये यासाठी काही वेगळे उपायही करून पहायला हवे. काही घरगुती पदार्थ वापरुनही तुम्ही केसांतील डँड्रफची समस्या दूर करू शकता. हे पदार्थ वापरल्यास तुम्हाला बाजारातील प्रॉडक्टस् वापरण्याची गरज अजिबात राहणार नाही.
सफरचंदाच्या व्हिनेगरचा वापर :
सफरचंदापासून बनवलेल्या व्हिनेगरचा वापर तुम्ही तुमच्या केसांसाठीही करू शकता. याने तुमच्या केसातील डँड्रफ कमी होऊ शकेल.
यासाठी एका मोठ्या बाउलमध्ये सफरचंदाचे व्हिनेगर घेऊन त्याचा वापर तुम्ही करू शकता. यामुळे तुमच्या केसात असलेला डँड्रफ कमी होण्यास मदत होईल.
एका मोठ्या बाउलमध्ये व्हिनेगर घ्या. जेवढ्या प्रमाणात व्हिनेगर घेतलं आहे तेवढ्याच प्रमाणात बाउलमध्ये पाणी घ्या.
आता याच्या मदतीने केस स्वच्छ धुवून घ्या. अगदी याचप्रकारे 5 मिनिटांनंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या.
यामुळे तुमचा स्कॅल्प हेल्दी राहिल. सोबतच स्कॅल्प मुलायमदेखील राहतो.
यासाठी आठवड्यातून एकदा तरी हा उपाय करायला हवा.
व्हिनेगर तुम्हाला बाजारात सहजरित्या मिळू शकेल. जे तुम्ही केसांसाठी वापरू शकाल.
मेथी दाणे आणि नारळ तेलाचा वापर :
तुम्ही तुमच्या केसांसाठी मेथी दाण्यांचा आणि नारळ तेलाचाही वापर करू शकता. यामुळे केस निरोगी राहतात. सोबतच डँड्रफची समस्याही कमी होते.
या उपायाकरता रात्रभर मेथीचे दाणे भिजवत ठेवा.
त्यानंतर त्यातील पाणी काढून दाणे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
यानंतर यामध्ये 2 चमचे नारळ तेल मिक्स करून घ्या आणि ते केसांना लावा.
हे मिश्रण साधारण 20 मिनिटांकरता केसांवर राहू द्यात. नंतर शॅम्पू लावून केस स्वच्छ धुवून घ्या.
यामुळे केसांतील डँड्रफची समस्या कमी होऊ शकेल.
या गोष्टींकडे द्या लक्ष :
केसांना निरोगी ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे योग्य पदार्थांचा वापर करणे.
केसांमध्ये कोंडा असेल तर तेल असलेल्या पदार्थांचा कमी प्रमाणात वापर केसांसाठी करावा.
केस ओले असतानाच बांधू नका. यामुळे केसगळती आणि डँड्रफ अशा दोन्ही समस्या वाढू शकतात.
जर डोक्यात डँड्रफमुळे खाज जास्त येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य त्या पदार्थांचा वापर करावा.
हेही वाचा : Pet Benefits for Health : आरोग्यासाठी पाळीव प्राणी बेस्ट
Edited By – Tanvi Gundaye