Sunday, January 5, 2025
HomeमानिनीHealthWinter Health : हिवाळ्यात 'चाकवत' करते जीवनसत्त्वांची पूर्तता

Winter Health : हिवाळ्यात ‘चाकवत’ करते जीवनसत्त्वांची पूर्तता

Subscribe

चाकवत ही मुख्यत: हिवाळ्यात खाल्ली जाणारी पौष्टिक पालेभाजी आहे. याला हिवाळ्यातील ‘सुपरफूड’ असेही म्हणता येईल. त्यापासून बनवलेले पराठे, रायते, सूप आणि भाज्या खूप चविष्ट असतात. चाकवतासारख्या हिरव्या पालेभाज्या केवळ पोषणच देत नाहीत तर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवतात.

अनेक प्रकारची जीवनसत्त्वे तसेच पोषकतत्त्वे या भाज्यांमध्ये असतात. या हिरव्या भाज्यांमध्ये खनिजे आणि फायबर देखील भरपूर प्रमाणात असतात. यामुळेच अशा पालेभाज्या स्वादिष्ट असण्यासोबतच जर नियमितपणे खाल्ल्या गेल्या तर अनेक आरोग्यदायी फायदेही देतात. जाणून घेऊया चाकवत भाजीमध्ये नेमकी कोणती जीवनसत्वे आढळतात आणि त्याचे फायदे काय आहेत याबद्दल.

- Advertisement -

चाकवतामध्ये आढळतात ही जीवनसत्त्वे :

व्हिटॅमिन ए :

चाकवत हा व्हिटॅमिन ए चा मुख्य स्त्रोत आहे. हे दृष्टी सुधारण्यासाठी, त्वचेची चमक राखण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी मदत करते.

- Advertisement -

व्हिटॅमिन सी :

यात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते, शरीराला संसर्गापासून वाचवते आणि त्वचा निरोगी व तरुण ठेवते.

व्हिटॅमिन के:

व्हिटॅमिन के रक्ताच्या गुठळ्या कमी करण्यास मदत करते आणि हाडांच्या मजबुतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. हाडे मजबूत ठेवण्यासाठी हे उपयुक्त आहे.

व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स:

चाकवत भाजीमध्ये व्हिटॅमिन-बी 6, फोलेट आणि थायमिन असते, जे मेंदूच्या विकासासाठी आणि मज्जासंस्थेचे कार्य सुधारण्यासाठी मदत करते.

व्हिटॅमिन-ई:

हे त्वचा मऊ आणि चमकदार बनवते आणि वृद्धत्वाचा प्रभाव कमी करते.

Winter Health: 'Bathua vegetable' replenishes vitamins in winter

चाकवत खाण्याचे फायदे :

पचन सुधारण्यास उपयुक्त- चाकवतामध्ये भरपूर फायबर असते, जे पचनसंस्था निरोगी ठेवते. याच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अपचन आणि पोटाच्या समस्या दूर होतात.

त्वचेची काळजी – यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए आणि सी त्वचेला नैसर्गिक आर्द्रता देते. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवतात.

मधुमेहात फायदेशीर- चाकवतामध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म भरपूर असल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते . मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा एक उत्कृष्ट पर्याय आहे, जो त्यांना मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

हाडांची मजबूती- या भाजीत कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के चांगल्या प्रमाणात आढळते , ज्यामुळे हाडे मजबूत होतात आणि ऑस्टियोपोरोसिस सारख्या आजारांच्या समस्या टळतात.

डोळ्यांसाठी फायदेशीर- यात असलेले व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन दृष्टी सुधारण्यासाठी मदत करतात. मोतीबिंदू आणि रातांधळेपणा यांसारख्या समस्या टाळण्यास यामुळे मदत होते.

डिटॉक्सिफिकेशन- चाकवत शरीराला डिटॉक्सिफाय करते. यामुळे रक्त शुद्ध होते आणि त्वचेवर चमक येते.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त- कमी कॅलरी आणि जास्त फायबर असलेले चाकवत वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.

हेही वाचा : Health Tips : अक्रोड आणि खजूर एकत्र खाल्ल्यास काय होते ?


Edited By – Tanvi Gundaye

- Advertisment -

Manini