घरताज्या घडामोडीWinter Health care : हिवाळ्यात 'या' पदार्थांचे करा उपाशीपोटी सेवन ; वाचा...

Winter Health care : हिवाळ्यात ‘या’ पदार्थांचे करा उपाशीपोटी सेवन ; वाचा आरोग्यदायी फायदे

Subscribe

आपण सकाळी उठल्यापासून जे काही खातो त्यावरच आपले आरोग्य अवलंबून असते. याशिवाय आपली दिवसभरातील शरीराची ऊर्जा ही सकाळच्या नाश्ता किंवा जे काही पदार्थ आहारात असतात त्यावर अवलंबून आहे. प्रामुख्याने हिवाळ्यात आरोग्याच्या समस्याही जोर धरत असतात.त्यामुळे अनेकजण आपल्या खाण्यापिण्यामध्ये बदल करतात.थंडीच्या काळात व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता सर्वाधिक असते. यासोबतच, रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते, ज्यामुळे ताप,सर्दी इत्यादी समस्या वाढतात. त्यामुळे अशा गोष्टींचा आहारात समावेश करावा, ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती निरोगी राहील आणि शरीर उबदार होण्यास मदत होईल.

कोमट पाणी

- Advertisement -

तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात एका ग्लासात कोमट पाणी घेऊन त्यात लिंबू आणि थोडं मध घालून प्यावे. त्यामुळे शरीरातून विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात आणि पचनसंस्था नीट काम करते. याशिवाय याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी होतो.

बदाम

- Advertisement -

 

बदाम हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. बदाम हे मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई, प्रोटीन, फायबर, ओमेगा ३ आणि ओमेगा ६ सारख्या घटकांनी समृद्ध असतो.त्यामुळे बदाम हे रात्री पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी त्याचे सेवन करा. जेणेकरुन, तुमचे शरीर उबदार राहण्यास मदत होईल.

अंजीर

हिवाळ्यात ड्रायफुट खाणे आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. तुमच्या आहारात औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले अंजीर आणि सुका मेवा देखील तुम्ही समाविष्ट करू शकता. रात्री झोपण्यापूर्वी ३-४ अक्रोड २ अंजीर आणि २-३ मनुके भिजवून ठेवा आणि सकाळी पाण्यासोबत सेवन करा. त्यामुळे अनेक आजारांपासून सुटका मिळते.

पपई

पपई पचनसंस्थेसाठी उपयुक्त ठरते. रोज सकाळी याचे सेवन केल्याने आतडे व्यवस्थित स्वच्छ होतात, ज्यामुळे  बद्धकोष्ठता, अॅसिडिटी यासारख्या समस्यांपासून सुटका होण्यास मदत होते. तसेच वजनही कमी होते.

 


हे ही वाचा – आता LPG Cylinder चे वजन कमी होणार ; केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -