Friday, January 24, 2025
HomeमानिनीHealthWinter Health : स्वेटर, ब्लँकेट पांघरून झोपल्याने वाढतो हृदय विकार आणि बीपी

Winter Health : स्वेटर, ब्लँकेट पांघरून झोपल्याने वाढतो हृदय विकार आणि बीपी

Subscribe

आता थंडीचा हंगाम असल्याने लोकरीचे कपडे घालणे सगळ्यांसाठीच गरजेचे झाले आहे. सकाळ असो वा रात्र, प्रत्येकजण स्वेटरपासून लोकरी टोपीपर्यंत सर्व काही परिधान करत असताना आपल्याला दिसतात. पण या सामान्य दिसणाऱ्या कृतीबाबत एका यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून भीतीदायक दावा करण्यात आला आहे.

जे लोक लोकरीचे कपडे घालून झोपतात त्यांना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे प्रचंड थंडीतही सर्वांनी रात्री उबदार कपडे घालून झोपायचे सोडून द्यावे असं या व्हिडीओच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. पण या सल्ल्याचे पालन करण्यापूर्वी, या दाव्याचे सत्य आणि असत्य नेमके काय आहे ते जाणून घेणे गरजेचे आहे.

यूट्यूबवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये असे म्हटले आहे की, थंडीत लोकरीचे कपडे परिधान करणे हानिकारक ठरू शकते. असे केल्याने एक्जिमा, पायावर पुरळ उठणे, रक्तदाब कमी होणे, अस्वस्थता, ऍलर्जी, खाज येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, प्रजनन क्षमतेवर परिणाम आणि झोपेचा त्रास यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. इतकेच नाही तर लोकरीचे कपडे घालून झोपणे हृदयाचा आजार असणाऱ्यांसाठी धोकादायक असल्याचा दावाही व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. तसेच नेहमी लोकरीचे कपडे, मोजे किंवा टोपी घालण्यास मनाई करण्यात आली आहे.

डॉक्टरांचे म्हणणे काय ?

याबाबत डॉक्टरांकडे विचारणा केली असता त्यांचं यावर नेमकं म्हणणं काय याविषयी या लेखातून जाणून घेऊयात. लोकरीचे कपडे तापमान नियंत्रित ठेवून शरीराला उबदार ठेवतात. यामुळे त्वचा कोरडी होत नाही आणि रक्ताभिसरणही व्यवस्थित होत राहते. सकाळच्या वेळी जेव्हा तापमान खूप कमी असते तेव्हा हृदयविकाराचा झटका अधिक येतो, परंतु लोकरीचे कपडे आपल्याला या समस्येपासून वाचवतात. त्यामुळे रक्तातील उष्णता टिकून राहते.व गुठळ्या होण्याचा धोका संभवत नाही.

Winter Health: Sleeping with sweaters, blankets increases heart disorders and BP

उबदार कपडे घालण्याचे फायदे :

लोकरीचे कपडे शरीरात उष्णता टिकवून ठेवतात, त्यामुळे सर्दी किंवा खोकल्याची तक्रार निर्माण होत नाही. यामुळे, व्यक्ती चांगल्यारितीने श्वास घेऊ शकतो आणि त्याला झोपेचा त्रासही होत नाही. चांगली झोप नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवते.

पण लक्षात ठेवा :

लोकरीचे कपडे बहुतेक वेळा कपाटात साठवून ठेवलेले असतात, म्हणून हिवाळ्यात घालण्यापूर्वी ते धुण्यास आणि उन्हात वाळवण्यास विसरू नका. यामुळे इन्फेक्शन, फंगस, बॅक्टेरिया इ.ची शक्यता नाहीशी होते. चांगली झोप येण्यासाठी झोपण्यापूर्वी अंगावर तिळाचे तेल लावा. यामुळे त्वचेला पोषण तर मिळतेच पण वात आणि कफ यांचा दोषही कमी होतो.

परिणाम काय ?

डॉक्टरांचे मत विचारात घेतले असता सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पूर्णपणे खोटा असल्याचे आढळले आहे. त्यात नमूद केलेल्या बाबी डॉक्टरांनी पूर्णपणे नाकारल्या आहेत. मात्र असं जरी असलं तरी डॉक्टरांनी लोकरीच्या कपड्यांच्या स्वच्छतेकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा : Winter Beauty Tips : हिवाळ्यात चेहऱ्यावरील ग्लो असा ठेवा कायम


Edited By – Tanvi Gundaye

Manini