Friday, November 29, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीBroccoli Benefits : हिवाळ्यातील सुपरफूड आहे ब्रोकोली

Broccoli Benefits : हिवाळ्यातील सुपरफूड आहे ब्रोकोली

Subscribe

थंडीच्या दिवसांत ‘ब्रोकली’ बाजारात भरपूर प्रमाणात विक्रीसाठी दिसतात. ‘ब्रोकोली’ची सुपर फूडमध्ये गणना केली जाते. हिरव्या फ्लॉवरप्रमाणे दिसणारा ‘ब्रोकोली’ आपण दोन प्रकारे खाऊ शकता. एक म्हणजे ब्रोकोली पूर्णपणे शिजवू शकतो, तर दुसरी पद्धत म्हणजे त्याला हलकी स्टीम देऊन खाऊ शकता. चला जाणून घेऊया हिवाळ्यात ब्रोकोली खाण्याचे आरोग्यदायी फायदे काय आहेत.

हिवाळ्यात ब्रोकोली खाण्याचे फायदे

आजारांपासून संरक्षण

हिवाळ्यात सर्दी, खोकला आणि फ्लूचा धोका अनेकदा वाढतो. ब्रोकोलीमध्ये असलेले व्हिटॅमिन सी रोग प्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीराला संसर्गापासून वाचवण्यास मदत करते.

- Advertisement -

त्वचा चमकदार 

ब्रोकोलीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे त्वचेला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवतात आणि ती चमकदार आणि निरोगी ठेवतात.

वजन नियंत्रित

वजन नियंत्रित ठेवायचे असल्यास नाश्त्यामध्ये ‘ब्रोकोली’ सलाड म्हणून खा. यामध्ये भरपूर फायबर आणि पोटॅशियम असतात, सूप करून देखील ब्रोकोलीचे सेवन करू शकता. त्यात खूप कमी कॅलरी असतात.

- Advertisement -

रोगप्रतिकारक शक्ती

ब्रोकोली आपल्याला बर्‍याच प्रकारच्या संक्रमणांपासून वाचवतो. तसेच हिवाळ्याच्या काळात शरीराला आतून उबदार ठेवून, थंडीपासून शरीराचे संरक्षण करतो.

हाडे

ब्रोकोलीमध्ये असलेले कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के हाडे मजबूत करतात. ऑस्टियोपोरोसिस सारख्या समस्यांना प्रतिबंध करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे.

आहारात ब्रोकोलीचा समावेश कसा करावा?

  • ब्रोकोली सूप तुम्हाला उबदार ठेवेल आणि हिवाळ्यात तुमचे पोषण करेल.
  • हे सॅलडमध्ये उकळून किंवा हलके तळून खाऊ शकता.
  • बटाटे किंवा मटारमध्ये ब्रोकोली मिसळून तुम्ही स्वादिष्ट भाजी बनवू शकता.
  • हिरव्या भाज्या आणि फळांमध्ये ब्रोकोली मिसळून स्मूदीज तयार करा.
  • नेहमी ताजी आणि गडद हिरवी ब्रोकोली खरेदी करा.
  • खरेदी केल्यानंतर, रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा आणि 3-4 दिवसात वापरा.

Edited By : Nikita Shinde

- Advertisment -

Manini