हिवाळ्यातील गुलाबी थंडी अनेक आजार सोबत घेऊन येते. सर्दी-खोकला, ताप यासारखे व्हायरल आजार हमखास या दिवसात सतावतात. आरोग्याच्या या तक्रारी दूर ठेवण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी या दिवसात तुम्हाला फळांचे, भाज्यांचे ज्यूस पिणे फायदेशीर ठरेल. या विविध ज्यूसची वेगळी वैशिष्टे आहेत. त्यामुळे जाणून घेऊयात, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोणते ज्यूस प्यायला हवेत,
आवळ्याचा ज्यूस –
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी गरजेचे असते. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे या दिवसात आवळ्याचा ज्यूस पिणे फायदेशीर ठरेल. आवळ्यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे रोगप्रतिकारशक्ती तर वाढतेच शिवाय त्वचा आणि केसांचे आरोग्यही वाढते.
संत्र्याचा ज्यूस –
व्हिटॅमिन सी युक्त संत्र्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी सारखे पोषक घटक असतात. तुम्ही रोगप्रतिकराशक्ती वाढवण्यासाठी संत्र्याचा ज्यूस प्यायला हवा.
टोमॅटोचा ज्यूस –
हिवाळ्यात टोमॅटोचा ज्यूस पिणे फायदेशीर ठरते. टोमॅटोमध्ये मुबलक प्रमाणात फायबर आणि व्हिटॅमिन बी 9 आढळते. ज्यामुळे संसर्ग टाळता येतात. याशिवाय टोमॅटोच्या ज्यूसच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि बद्धकोष्ठेतेची समस्या दूर होते.
गाजर आणि बीटाचा ज्यूस –
गाजर आणि बीटामध्ये आयर्न, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन ए सारखी अनेक पोषक घटक आढळतात. शरीर निरोगी ठेवण्यासह हा ज्यूस त्वचेसाठी फायदेशीर असतो. गाजर आणि बीटाचा ज्यूस तयार करण्यासाठी 3 ते 4 गाजर, 1 बीट, धणे, आले, काळे मीठ आणि साखर मिक्स करावी लागेल.
याशिवाय हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही तूपाचे सेवन करू शकता. तूपामुळे कॅलरी वाढते आणि शरीर उबदार राहते. याव्यतिरीक्त गुळाचे सेवन फायदेशीर ठरेल. पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी गुळ खायला हवा. तुम्ही सूप सुद्धा पिऊ शकता. सुकामेव्याचे सेवन करणे या दिवसात फायदेशीर ठरेल, कारण सुकामेवा शरीर उबदार ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde