असं म्हटलं जातं की हृदय तरुण असेल तर माणूस नेहमी तरुण राहतो. पण प्रश्न असा आहे की हृदय तरुण ठेवण्यासाठी काय करायला हवे? कारण थंडीचा ऋतू सुरू होताच हृदयाच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. हृदय आजारी पडलं की साहजिकच तब्येत बिघडते. त्यामुळे हिवाळ्यात हृदय निरोगी ठेवणे खूप गरजेचे आहे.
सर्वप्रथम थंडीपासून स्वतःचे संरक्षण करा:
हिवाळ्यात हृदय निरोगी ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना करता येतील. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे स्वत:चा थंडीपासून बचाव करणे. जर तुम्ही हिवाळ्यात थंडीपासून स्वतःचे संरक्षण केले नाही तर त्याचा सर्वात आधी हृदयावर परिणाम होतो. कधी कधी प्रचंड थंडीमुळे हृदयाचे ठोकेही बंद होतात. केवळ हिवाळ्यातच हृदयविकाराचा झटका येण्याचे हे एक कारण आहे.
कोमट पाणी पिण्याची सवय लावा :
उन्हाळ्यात थंड पाणी पिणे हे कधीकधी शरीरासाठी आवश्यक असते पण हिवाळ्यात थंड पाणी पिणे हानिकारक ठरू शकते. त्यामुळे डॉक्टर हिवाळ्यात कोमट पाणी पिण्याचा सल्ला देतात. हिवाळ्यात कोमट पाणी फक्त हृदयासाठीच चांगले नाही तर संपूर्ण शरीरासाठीही खूप फायदेशीर ठरते. दररोज सामान्य पाणी कोमट करण्याचा प्रयत्न करा आणि ते पाणी थर्मासमध्ये भरून ठेवा. म्हणजे तुम्हाला कोणत्याही वेळी गरम पाणी पिता येईल.
हलका व्यायामही आहे महत्त्वाचा :
हिवाळ्यात हृदय निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम करणेही महत्त्वाचे आहे. पण लक्षात ठेवा की हिवाळ्यात शरीरावर जास्त भार पडेल असे व्यायाम करणे टाळा. बरेचदा लोक सकाळी अंथरुणातून उठताच धावायला जातात. तापमानातील बदलामुळे हार्ट फेल्युअरचा धोका वाढतो. त्यामुळे, अंथरुण सोडताच धावायला जाणे टाळा. शरीराचे तापमान सामान्य केल्यानंतर, तुम्ही काही काळ चालू शकता किंवा घरी व्यायाम किंवा योग करू शकता.
व्यसनांपासून रहा दूर :
सिगारेट, दारू किंवा तंबाखू हे हृदयाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. जर तुम्ही त्यांच्यापासून दूर राहिलात तर तुमचे हृदयही तुम्हाला साथ देईल. तुम्हालाही तुमच्या हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी या गोष्टी सोडाव्या लागतील. जर तुम्हाला ड्रग्सचे व्यसन लागले तर त्याचा सर्वात वाईट आणि घातक परिणाम तुमच्या हृदयावर होतो. यासाठीच जर तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर तुम्हाला या सर्व व्यसनांपासून दूर रहावे लागेल.
हेही वाचा : Health Tips : सातच्या आत जेवा ,राहा हेल्दी
Edited By – Tanvi Gundaye