बदलत्या ऋतूमानानुसार लोकांची ड्रेसिंग स्टाईलही बदलत असते. वातावरणानुसार लोक कपडे परिधान करण्याला प्राधान्य देतात. परंतु हिवाळ्याच्या दिवसात महिला आपल्या आऊटफिट विषयी फारच गोंधळलेल्या असतात. विशेषत: हिवाळ्यातला पोशाख नेमका कसा असावा हे त्यांना समजत नाही. कारण या ऋतूमध्ये त्या नेहमी असे कपडे घालण्याला प्राधान्य देतात ज्या थंडीपासूनही बचाव करतील आणि स्टायलिश लूकही देतील.
यावरचा बेस्ट पर्याय म्हणजे हिवाळी जॅकेटस. याला तुम्ही कोणत्याही प्रकारे स्टायलिश दिसण्यासाठी वापरू शकता. खरंतर, हे एकाच प्रकारचं जॅकेट तुम्ही प्रत्येक आऊटफिटवर वापरू शकत नाही. अशात तुम्ही काही जॅकेट्सच्या पर्यायांचा विचार करू शकता. जे तुम्हाला इंडियन आणि वेस्टर्न दोन्ही लूकसाठी परफेक्ट ऑप्शन्स देऊ शकतील.
डेनिम जॅकेट :
डेनिम जॅकेटची फॅशन तशी जुनीच आहे. परंतु आजही अनेक महिलांची ही पहिली पसंती आहे. कूल लूक किंवा कॅज्युअल लूक मिळवण्यासाठी याचा जास्त वेळा वापर केला जातो. तुम्ही याला एथनिक लूकसोबतही मॅच करू शकता.डेनिम जॅकेट तुम्ही तुमच्या आवडीनुसार साध्या पद्धतीचे किंवा प्रिंटेड स्टाईलचे निवडू शकता.
पफर जॅकेट :
हिवाळ्यात अनेक महिलांना स्पोर्टी लूक कॅरी करायला फार आवडतो. अशात तुमच्या व्यक्तिमत्त्वाला चार चाँद लावू शकणारे जॅकेट म्हणजे पफर जॅकेट. विशेष म्हणजे पफर जॅकेट थंडीपासून आपला बचाव करण्यासाठी खूपच फायदेशीर आहे. जीन्स टॉप आणि बूट्स हे आपल्या हिवाळ्यातील फॅशनमधील मुख्य घटक असतात. त्यामुळे यांच्यासोबत मॅच करण्यासाठी पफर जॅकेट तुम्ही कॅरी करू शकता. पफर जॅकेटमध्ये तुम्हाला लॉन्ग आणि शॉर्ट असे दोन्ही ऑप्शन्स मिळू शकतात.
ट्रेंच कोट जॅकेट :
ट्रेंच कोट ज्याला जॅकेटदेखील म्हटलं जातं. हिवाळ्यात जर तुम्हाला स्टायलिश दिसायचं असेल तर तुम्ही या जॅकेटला तुमच्या वॉर्डरोबचा हिस्सा जरूर बनवू शकता. हा तुम्हाला स्टायलिश आणि युनिक लूक देऊ शकेल. हा ब्लेझर आणि कोट या दोघांचीही कमतरता पूर्ण करतो. विशेष बाब म्हणजे हे जॅकेट तुम्ही साडीसोबतही मॅच करू शकता. खरंतर, ट्रेंच कोट जॅकेट लांब असतं ज्यामुळे ते साडीसोबत सहजरित्या परिधान केलं जाऊ शकतं. ट्रेंच कोट जॅकेटमध्ये तुम्ही लूज आणि बॉडी फिट असे दोन्ही ऑप्शन्स ट्राय करू शकता.
प्रिंटेड जॅकेट :
या दिवसांमध्ये प्रिंटेड जॅकेट खूपच ट्रेंडमध्ये आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमचा लूक अधिकच स्टायलिश बनवू शकता. प्रिंटेड जॅकेट तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वानुसार कॅरी करू शकता. हे परिधान करण्यासाठी अगदी आरामदायक आहे. खरंतर, हे परिधान करण्यासाठी एक वुलन टॉप अवश्य कॅरी करा. आणि नंतर त्यावर प्रिंटेड जॅकेट घाला. बाजारात प्रिंटेड जॅकेटमध्ये अॅनिमल प्रिंट, फ्लोरल प्रिंट असे पर्याय मिळू शकतात.
ब्लॅक लेदर जॅकेट :
ब्लॅक लेदर जॅकेटला तुमच्या वॉर्डरोबचा भाग अवश्य बनवा. हे कोणत्याही आऊटफिटसोबत अगदी सहज मॅच केलं जाऊ शकतं. जेव्हा तुम्ही विंटर आऊटफिटसाठी काय निवडावं याबाबत कन्फ्यूज असाल तर हा तुमच्यासाठी चांगला ऑप्शन ठरू शकतो. ब्लॅक लेदर जॅकेटची फॅशन तशी जुनी आहे परंतु महिलांची आजही याला पसंती आहे.
हेही वाचा : Fashion Tips : परिपूर्ण लूकसाठी साडीवर स्वेटर ऐवजी श्रग करा ट्राय
Edited By – Tanvi Gundaye