आपण सुंदर दिसावं, आपला चेहरा चमकदार आणि टवटवीत दिसावा असं प्रत्येक महिलेला वाटत असतं. तसं पाहायला गेलं तर हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणं सर्वात महत्त्वाचं असतं. कारण या ऋतूत त्वचा सर्वात जास्त कोरडी आणि तडकलेली दिसते. अशा परिस्थितीत, आपण काही गोष्टी पाळणं महत्वाचं आहे ज्यामुळे आपली त्वचा हायड्रेटेड राहू शकेल. दिवसभराच्या कामाच्या दगदगीमुळे आपल्या चेहऱ्यावर थकवा जाणवू लागतो. यासाठीच रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वीदेखील आपण आपल्या त्वचेची देखभाल करणं फार आवश्यक आहे. नेमकी आपण आपल्या त्वचेची हिवाळ्यात कशी काळजी घेऊ शकतो? त्यासाठी काय काय करावं हेच आजच्या लेखातून सविस्तर रित्या जाणून घेऊयात.
अॅलोवेरा जेल त्वचेवर लावा :
तुमची त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी एलोवेरा जेलचा वापर तुम्ही करू शकता. एलोवेरा जेल त्वचेसाठी चांगले असते. तसेच त्यामुळे त्वचेवर कोणतीही समस्या उद्भवत नाही. यासाठी तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ताजा कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावू शकता किंवा बाजारात उपलब्ध असलेले अॅलोवेरा जेलही वापरू शकता. हे चेहऱ्यावर लावून चांगली मालिश करा आणि झोपी जा. दुसऱ्या दिवशी सकाळी चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे त्वचा मुलायम राहण्यास मदत होईल.
सीरम वापरा :
तुमचा चेहरा हायड्रेटेड ठेवण्यासाठी तुम्ही सीरमही वापरू शकता . तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तेच सीरम वापरा जे तुमच्यासाठी योग्य असेल. यामुळे तुमची त्वचा तजेलदार दिसेल.
क्रीमचा करा वापर :
तुमच्या चेहऱ्यासाठी सीरम वापरल्यानंतर त्यावर क्रीमचा वापर तुम्ही करू शकता. यासाठी तुम्ही घरी उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून क्रीम बनवू शकता किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन बाजारातील रेडीमेड क्रीमही चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे तुमची त्वचा निरोगी राहील.
अशाप्रकारे जर तुम्ही नाईट स्किन केअर रूटीन फॉलो केले तर हिवाळ्यातही तुमची त्वचा निरोगी आणि तजेलदार राहण्यास मदत होईल व हवामानामुळे तुमच्या त्वचेवर होणाऱ्या समस्याही फार दिसणार नाहीत.
हेही वाचा : Kitchen Tips : पिठाला किड लागते? या उपायांनी करा दूर
Edited By – Tanvi Gundaye