घरलाईफस्टाईलमाहीत आहे का? पोटाला पण होते सर्दी?

माहीत आहे का? पोटाला पण होते सर्दी?

Subscribe

हिवाळ्यातली गुलाबी थंडी जितकी उबदार आणि बोचरी असते तितकीच ती आजारांनाही आमंत्रण देणारी असते. यामुळे थंडीच्या दिवसात छातीत कफ साचून सर्दी, खोकला होणे ही सामान्य समस्या असते. पण तुम्हांला वाचून गंमत वाटेल की या दिवसात पोटालाही सर्दी होते. यामुळे हिवाळ्यात सर्दी खोकल्याबरोबरच उल्टी, जुलाब यासारखे आजारही होतात.

पोटाला सर्दी कशी होते?
थंडीच्या दिवसात शरीराला उष्ण ठेवण्यासाठी अतिरिक्त कॅलरीजची गरज असते. या अतिरिक्त कॅलरीजमुळे पचनप्रक्रिया सक्रिय होते. यामुळे थंडीत सतत भूख लागते.आपण सतत खात असतो. परिणामी या अतिरिक्त खाण्यामुळे पचनसंस्थेवर ताण पडतो आणि तिचे कार्य मंदावते. साहजिकच त्यामुळे अॅसिडीटी होते, पोट खराब होतं. पोटात थंडी वाजते. जर असा त्रास तुम्हालाही जाणवला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

- Advertisement -

पोटात थंडी वाजत असेल तर आर्युर्वेदीक उपचार सर्वात फायदेशीर आहे. यासाठी किचनमध्ये असलेले मसाले औषधांचे काम करतात. यामुळे जर तुम्हांलाही असा त्रास होत असेल तर जीरे, धने, बडीशोप, ओवा आणि मेथी यांचा काढा प्यावा. दिवसातून दोन वेळा हा काढा घेतल्यास पोटातील सर्दीपासून आराम मिळेल. हे सर्व मसाले अँटीऑक्साईड, अँटीव्हायरल,अँटीसेप्टीकचे काम करतात. त्यामुळे शऱीराचे तापमान सामान्य राहण्यास मदत होते.

तसेच पोटातील सर्दीपासून आराम मिळावा यासाठी जीरे, धने, ओवा आणि मेथी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी. सकाळी ते पाणी प्यावे.

- Advertisement -

केसर, शिलाजीत,मध आणि पाण्याचे सेवन केल्यानेही पोटातील सर्दी कमी होते. त्यासाठी एका कढईत पाणी घेऊन त्यात वरील साहीत्य उकळून घ्यावे. नंतर हे पाणी गाळून घ्यावे त्यात मध टाकून दिवसातून दोन ते तीन वेळा प्यावे. लगेच आराम मिळतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -