हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणे ही समस्या सामान्य आहे. विशेषतः हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा आणखी वाढतो. वास्तविक, या काळात वाहणारे थंड वारे त्वचा कोरडी आणि निर्जीव बनवू लागतात. अशा परिस्थितीत त्वचेची काळजी घेणे सोपे काम नाही. यावर मात करण्यासाठी लोक अनेकदा बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांचा वापर करतात. यापैकीच एक म्हणजे टोनर. ज्याचा वापर लोक त्यांचा चेहरा चमकदार करण्यासाठी करतात. मात्र, बाजारात उपलब्ध असलेल्या रासायनिक उत्पादनांचा वापर करण्याऐवजी घरी बनवलेले नैसर्गिक टोनर वापरणे हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. हे टोनर्स तुमची त्वचा हायड्रेट तर करतातच शिवाय तिला ओलावा आणि पोषण देण्यासही मदत करतात. आज आपण जाणून घेऊयात घरच्या घरी टोनर कंसं बनवायचं याबद्दल.
गुलाबपाणी आणि लिंबू वापरून बनवा घरगुती टोनर :
टोनर बनवण्यासाठी साहित्य
2 चमचे गुलाब पाणी
2 चमचे पाणी
1 चमचा ताजा लिंबाचा रस
गुलाबपाणी आणि लिंबाचा टोनर कसा बनवाल ?
एका भांड्यात गुलाबजल, लिंबाचा रस आणि पाणी मिसळा. चमच्याच्या मदतीने सर्व साहित्य चांगले मिसळा. हे मिश्रण रिकाम्या स्प्रे बाटलीत भरा. त्यानंतर, चेहऱ्यावर आणि मानेवर स्प्रे करा. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कापसाच्या साहाय्यानेही हे मिश्रण चेहऱ्यावर लावू शकता. गुलाब पाणी तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ करू शकते आणि लिंबाचा रस त्वचेला चमकदार बनवू शकतो.
चहाची पाने आणि मध टोनर :
आवश्यक साहित्य
1 कप ग्रीन टी किंवा ब्लॅक टी
1 टेस्पून मध
1 कप पाणी
चहाची पाने आणि मधापासून असे तयार करा टोनर :
सर्व प्रथम, पाण्यात ग्रीन टी टाका, उकळवा आणि थंड होऊ द्या. नंतर त्यात मध घालून चांगले मिसळा. आता हे मिश्रण तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता. ग्रीन टीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स त्वचेची दुरुस्ती करण्यास मदत करतात. त्याच वेळी, मध आपली त्वचा हायड्रेटेड ठेवते आणि हिवाळ्याच्या हंगामात कोरडेपणापासून संरक्षण करते.
हेही वाचा : Fashion Tips : वेलवेटच्या साड्या आणि लेहंग्यांचा ट्रेंड
Edited By – Tanvi Gundaye