गुलाबी थंडीचे दिवस सुरू झाले की, अनेकजणांचे पिकनिकचे प्लॅन सुरू होतात. सर्वानाच या गुलाबी थंडीचा अनुभव घ्यायचा असतो. काही जण संपूर्ण कुटूंबासह पिकनिकचे आयोजन करतात. पण, तुमच्या घरात जर लहान मुले असतील तर अशावेळी थंडीच्या दिवसात पिकनिकला जाताना खबरदारी घेणं आवश्यक आहे. या दिवसातील थंडी लहान मुलं आजारी पडण्याचे कारण ठरू शकते. त्यामुळे लहान मुलांसह कुठे पिकनिकला जात असाल तर काही गोष्टींकडे तुम्ही लक्षात घ्यायला हव्यात.
कपडे –
लहान मुलांना घेऊन पिकनिकचा प्लॅन करताना, सर्वात महत्वाची गोष्ट योग्य कपड्यांची निवड करणे. लहान मुलांना सोबत घेऊन पिकनिकला जाणार असाल तर उबदार कपड्यांची निवड करावी. जेणेकरून थंडीमुळे बदलत्या वातावरणात मुलांना सर्दी-खोकल्याची समस्या जाणवणार नाही.
शुज –
लहान मुलांना थंडीच्या दिवसात फिरायला घेऊन जाताना एक्स्ट्रा शुजचा जोड घेऊन जायला हवा. कारण लहान बाळांना या दिवसात शु चा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे या दिवसात एक्स्ट्रा शुज सह सॉक्स सोबत ठेवा.
कानटोपी –
एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, थंड हवा कानात जाऊन आजाराचे कारण बनू शकते. त्यामुळे सर्वात पहिले तर लहान मुलांचे कान तुम्ही झाकायला हवेत. यासाठी कानटोपीचा वापर करायला हवा.
कपडे बदला –
मुलांच्या अंगावर प्रवास करताना ओले कपडे चुकूनही ठेवू नका. कारण अनेक महिला थोडे ओले झाले आहेत सुकून जातील. असे म्हणत ओले कपडे तसेच ठेवतात. पण, असे करणे महागात पडू शकते. ओल्या कपड्यांमुळे ताप, सर्दी सह त्वचेच्या तक्रारी उद्भवू शकतात.
गरम पदार्थ –
प्रवासात मुलांना गरम पाणी, गरम अन्नपदार्थच द्यावेत. जेणेकरून शरीर उबदार राहू शकते.
औषध –
मुलांना घेऊन प्रवास करताना काही औषधे सोबत ठेवावीत. जेणेकरून गरजेच्या वेळी औषधांचा वापर करता येईल.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde