घरताज्या घडामोडीWinter Weight Loss Tips: थंडीत वजन कमी करायचा विचार करताय? तर डाएटमध्ये...

Winter Weight Loss Tips: थंडीत वजन कमी करायचा विचार करताय? तर डाएटमध्ये खा ‘हे’ पदार्थ

Subscribe

रोजच्या आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास थंडीत वजन कमी करणे सोपे होईल

थंडी सुरू झाली आहे. थंडीच्या मोसमात चमचमीत, गरमागरम खाण्याची सर्वांची इच्छा असते. थंडीत सतत भूक लागते. त्यामुळे या काळात डाएट असलेल्यांची चांगलीच वाट लागले. थंडीत जास्त भूक लागते त्यामुळे वजन देखील वाढते. थंडीत उठून दररोज व्यायाम करणे फार कंटाळवाणे असते. या काळात सतत सुस्ती येत राहते. मग थंडीत वजन कसं कमी करायचं असा प्रश्न सर्वांना पडतो. मात्र रोजच्या आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास थंडीत वजन कमी करणे सोपे होईल. जाणून घ्या थंडीत वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करावा.

गाजर

- Advertisement -

थंडीत बाजारात मोठ्या प्रमाणात गाजर उपलब्ध असतात. गाजर हे पचायला जड असतात. मात्र गाजरामध्ये कमी कॅलरी असतात त्यामुळे वजन कमी होण्यास मोठी मदत होते. गाजर खाल्ल्याने पोट भरलेले राहते. सतत भूक लागत आणि त्यामुळे वजन देखील वाढत नाही.

बीट


वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये बीट खाणे कधीही उत्तम मानले जाते. बीटामध्ये वेट लॉस फ्रेंडली फायबर असतात. त्याप्रमाणे बीटात अनेक पोषक तत्वे देखील असतात त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

- Advertisement -

दालचीनी

प्रत्येक स्वयंपाक घरात दालचीनी हा मसाल्याचा पदार्थ असतो. दालचीनी देखील वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरते. दालचीनीमध्ये सिनमॉल्डेहाइड फॅट असतात जे मेटॉबॉलिजम संतुलित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे वजन देखील कंट्रोलमध्ये राहते.

पेरू

थंडीच्या दिवसात पेरुचा मोसम असतो. पेरुमध्ये असलेले मेटॉबॉलिजम आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. मेटॉबॉलिजमुळे वजन कमी होण्यास मदत होते.

दुधी

दुधीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन,खनिज आणि फायबर असतात ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. दुधेचे सेवन केल्याने लवकरात लवकर वजन कमी होण्यास मदत होते.

मेथी

थंडीत मेथीचे सेवन करणे आरोग्यासाठी गुणकारी आहे. मेथी एका औषधाप्रमाणे आहे. मेथीमध्ये ग्लॅक्टोमॅनन असते ज्यामुळे भूक कंट्रोल होण्यास मदत होते.


हेही वाचा – Beauty Tips: मुरुमांपासून मुक्ती हवी आहे? मग अंड्यापासून बनवलेला ‘हा’ फेसपॅक वापराच

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -