हल्लीच्या मुलांमध्ये स्क्रीनटाइमचे प्रमाण खूप वाढत चालले आहे. वारंवार फोन पाहणे, टीव्ही, योग्य आहार न घेतल्यामुळे मुलांना कमी वयातच चष्मा लागतो. पूर्वीच्या काळी चाळीशी नंतर चष्मा लागायचा परंतु आताच्या मुलांना प्रत्येक गोष्ट सहजपणे मिळत असल्याने मुलं अजूनच हट्टी होतात, त्यांचे सर्व हट्ट पुरवले जातात तसेच पालक देखील मुलांना सहजपणे फोन देऊन टाकतात. अशावेळी मुलं तासंतास फोन वापरतात. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यवर तर होतोच परंतु डोळ्यांची दृष्टी देखील कमी होऊ लागते. आज आपण जाणून घेऊयात, कोणत्या टिप्सने मुलांना कमी वयात चष्मा लागणार नाही.
मुलांमध्ये स्किनटाइमचे प्रमाण वाढण्याची कारणे
- कोविडच्या काळात ऑनलाइन शिक्षण आणि डिजिटल क्लासेसमुळे मुलांमध्ये स्किनटाइमचे प्रमाण वाढत गेले.
- गेम्स, व्हिडीओस आणि सोशल मीडियामुळे मुलं तासन्तास स्क्रीनवर वेळ घालवतात.
- आजकालच्या मुलांना सर्व गोष्टी सहजपणे मिळतात.
- त्यामुळे मुलं तासन्तास स्क्रीनवर वेळ घालवतात.
स्किनटाइमुळे होणारा परिणाम
डोळ्यांवर ताण
जास्त स्क्रीन टाइममुळे आपल्या डोळ्यांवर ताण येतो. त्यामुळे डोळयांची दृष्टी कमी होते.
झोपेच्या वेळेवर परिणाम
शारीरिक हालचालींचा अभाव, ज्यामुळे लठ्ठपणा होण्याचा धोका.
मानसिक परिणाम
जास्त स्क्रीन टाइममुळे आपण मानसिकरित्या अस्थिर होतो. आपल्या कोणत्याही गोष्टीमध्ये एकाग्र करता येत नाही. यामुळे आपला स्वभाव देखील बदलतो वारंवार चिडचिड किंवा राग, तणाव
उपाय
वेळेचे नियोजन करणे
आपल्या मुलांना वेळेचे नियोजन करून द्या. कोणत्यावेळी फोन वापरला पाहिजे. वारंवार मुलांना फोन देऊ नका.
मैदानी खेळ
हल्लीची मुलं फार मैदानी खेळ खेळत नाही. त्यामुळे मुलांना जास्तीत जास्त मैदानी खेळ खेळायला प्रोत्साहन करा. हे मुलांच्या शाररिक वाढीसाठी देखील अत्यंत गरजेचे असते.
छंद जोपासने
मुलांना नृत्य, कला, चित्रकला, खेळ इत्यादी छंद जोपासायला प्रोत्साहन द्या.
हेही वाचा : Breast Cancer : ब्रेस्ट कॅन्सर रोखण्यासाठी उपयुक्त ठरतील ही योगासन
Edited By : Prachi Manjrekar