घटस्फोट झालेल्या पुरूषांकडे ‘या’ ४ कारणांमुळे आकर्षित होतात महिला

प्रत्येक नातं प्रेम आणि विश्वासामुळे जोडलेले असते. जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येऊन त्याच नात्याला लग्नासारख्या मोठ्या बंधनात बांधण्याचा विचार करतात, तेव्हा प्रत्येक लहान-लहान गोष्टींकडे आवर्जून लक्ष दिले जाते. असे अनेक कपल्स आहेत, ज्यांच्यामध्ये एकमेकांबद्दल खूप प्रेम असते. मात्र त्याच्यातील होणाऱ्या गैरसमजांमुळे त्यांच्या नात्यात दूरावा येऊ लागतो. शिवाय आजकालच्या बिझी टाईममधून एकमेकांना पुरेसा वेळ देता येत नाही. त्यामुळे एकमेकांना नीट समजून घेता येत नाही. अशा अनेक कारणांमुळे अलीकडे घटस्फोटाच्या घटना खूप वाढू लागल्या आहेत.

दरम्यान घटस्फोट झालेले पुरूष नेहमीच महिलांना आपल्याकडे आकर्षित करतात. याची अनेक कारणं आहेत, जी त्यांच्या आधीच्या नात्यातील अनुभव आणि आयुष्याशी जोडलेली असतात. काही महिलांना घटस्फोट झालेल्या पुरूषांबद्दल आकर्षण का वाटते? याची नक्की काय कारणं आहेत? तुम्ही सुद्धा या गोष्टी जाणून घ्या, ज्या घटस्फोटीत पुरूषांमध्ये दिसून येतात.

नात्यात त्यांचा समजूतदारपणा दिसून येतो

जेव्हा आपल्याला आधीपासून एखाद्या गोष्टीचा अनुभव असतो. तेव्हा आपण आधी केलेली चूक परत करत नाही. तसेच जेव्हा एखाद्या पुरूषाचा घटस्फोट झाला असेल तर त्याला आधीच्या लग्नातून अनेक अनुभव आलेले असतात, जे त्याला पुढील दुसऱ्या नात्यासाठी उपयोगी पडतात. असा पुरूष आधीच्या नात्यात केलेली चूक दुसऱ्या नात्यात करत नाही, दुसरे नाते जोडताना आणि ते निभावताना तो प्रत्येक गोष्टीची पुरेपुर काळजी घेतो. या गोष्टींमुळे त्याचा समजूतदारपणा दिसून येतो. महिलांना नेहमी असाच पार्टनर हवा असतो, जो त्यांचे मन कधीही दुखावणार नाही.

सुरक्षित अनुभव करतात


जेव्हा पुरूष आपल्या वैवाहिक आयुष्यात अयशस्वी होतात, तेव्हा त्यांना त्यांच्या नात्यातील असफलतेचं कारण माहित असते, दुसऱ्या वेळी ते परत तीच चूक करत नाहीत. त्यामुळे अशा पुरूषांमध्ये घटस्फोटानंतर समजूतदारपणा आणि परिपक्वता येते. अशावेळी महिलांना वाटते की, असे पुरूष आपल्याला आयुष्यभर साथ देऊ शकतात.

कठीण परिस्थिती हाताळतात


जेव्हा एखाद्या पुरूषाचा घटस्फोट झालेला असतो, तेव्हा अशावेळी तो कठीण परिस्थितून बाहेर पडताना मनाने खूप धीट झालेला असतो. त्यामुळे नंतरच्या नातात्यातील आलेले अनेक कठीण प्रसंगांना तो न घाबरता स्वताः हाताळातो, महिलांना असेच पुरूष हवे असतात, जे त्यांना प्रत्येक कठीण काळात मानसिक आधार देतील. महिलांच्या मते अविवाहित पुरूषांपेक्षा घटस्फोट झालेले पुरूष जास्त समजूतदार असतात.

रोमाँटिक असतात


अनेक महिलांच्या म्हणण्यानुसार घटस्फोट झालेले पुरूष अनुभवी असल्यामुळे ते नात्यातील प्रत्येक गोष्ट व्यस्थित निभावतात. कामासोबतचं कुटुंबाला सुद्धा वेळ देतात. वेळीवेळी आपल्या पत्नीला खूश ठेवण्याचा प्रयत्न करतात.

 


हेही वाचा :Health Tips : तुम्ही सुद्धा उभं राहून पाणी पिता का? आजच व्हा सावधान नाहीतर होतील ‘हे’ आजार