Thursday, April 18, 2024
घरमानिनी8 मार्च रोजी महिला 'या' ठिकाणी करू शकतात मोफत प्रवास!

8 मार्च रोजी महिला ‘या’ ठिकाणी करू शकतात मोफत प्रवास!

Subscribe

दरवर्षी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन अर्थात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा, अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस म्हणून साजरा करतात. महिला दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी भारतात अनेक ठिकाणी महिलांना मोफत प्रवेश दिला जातो. तुम्हीही कुठेतरी प्रवास करण्याचा विचार करत असाल तर महिला दिनी नक्की जा. खरं तर, 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सांस्कृतिक मंत्रालयाने महिलांना खास भेट दिली होती. या दिवशी केवळ भारतीय महिला पर्यटकांनाच नाही तर विदेशी महिला पर्यटकांनाही या स्मारकांमध्ये मोफत प्रवेश देण्यात आला आहे. तेव्हापासून, दरवर्षी महिला कोणत्याही शुल्काशिवाय भारतातील कोणत्याही स्मारकाला भेट देऊ शकतात.

ताजमहाल

जर तुम्ही ताजमहाल पाहणार असाल तर आता तुम्हाला 200 रुपये खर्च करण्याची गरज नाही. ताजमहालमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला 50 रुपये मोजावे लागतात. जर तुम्हाला ताजमहालची मुख्य कबर आतून आणि वरून पाहायची असेल तर त्यासाठी तुम्हाला 200 रुपये वेगळे द्यावे लागतील. मात्र आता ते पाहण्यासाठी महिलांना शुल्क भरावे लागणार नाही.

- Advertisement -

लाल किल्ला

लाल किल्ल्यावर सोमवार ते शुक्रवार प्रति व्यक्ती 60 रुपये प्रवेश शुल्क आहे. याशिवाय शनिवार आणि रविवारी 80 रुपये शुल्क आकारले जाते. मात्र आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांकडून प्रवेश शुल्क आकारले जात नाही.

कुतुबमिनार

कुतुबमिनार येथे भारतीयांसाठी प्रवेश शुल्क 35 ते 40 रुपये प्रति व्यक्ती आहे. याशिवाय परदेशींकडून ५०० रुपये घेतले जातात. परंतु आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कुतुबमिनारमध्ये सर्व महिलांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.

- Advertisement -

त्याचप्रमाणे, अशी अनेक स्मारके आहेत, जिथे महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त प्रवेश शुल्क भरावे लागणार नाही.

जागतिक महिला दिन कधी सुरु झाला?

सर्वात पहिला जागतिक महिला दिन साजरा करण्याची सुरवात 28 फेब्रुवारी 1909 रोजी करण्यात आला. महिला दिनानिमित्त संयुक्त राष्ट्र संघात एक थीम तयार करण्यात आली होती. जागतिक महिला दिनाची पहिली थीम सेलिब्रेटिंग द पास्ट, प्लानिंग फॉर द फ्युचर ठेवली होती. विशेष म्हणजे प्रत्येकवर्षी जागतिक महिला दिवस साजरा करताना एक विशेष थीम बनवण्यात येते. यावर्षी महिला दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या थीमचे नाव ‘BalanceforBetter’

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा उदय एका कामगार आंदोलनातून झाला. 1908 साली याची पहिली ठिणगी पडली होती. यावर्षी 15 हजार महिलांनी न्यूयॉर्क शहराच्या रस्त्यावर मोर्चा काढून कामाचे तास कमी करण्याची मागणी केली होती.
याशिवाय त्यांच्या इतर प्रमुख मागण्यांपैकी दोन मागण्या होत्या – चांगलं वेतन मिळावं आणि मतदानाचा अधिकार मिळावा.
या आंदोलनाच्या वर्षभरानंतर अमेरिकेतल्या सोशालिस्ट पक्षाने 8 मार्च हा पहिला राष्ट्रीय महिला दिवस म्हणून घोषित केला.

- Advertisment -

Manini