प्रोटीन शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. शारीरिक वाढ होण्यासाठी प्रोटीनयुक्त आहार घेणे आवश्यक आहे. प्रोटिन्स शरीरात नवीन पेशी तयार करतात आणि त्यांना दुरुस्त करण्यातही मदत करतात. पुरुषांप्रमाणेच महिलांनाही प्रोटिन्सची आवश्यकता असते. शरीरात गरजेइतके प्रोटीन न गेल्यास सतत थकवा, अशक्तपणा जाणवतो. याशिवाय केस, त्वचा, नखे यांवर दिर्घ परिणाम होण्यास सुरुवात होते. तुम्हालाही सतत थकवा, अशक्तपणा जाणवतो का? चला तर मग जाणून घेऊयात, प्रोटीनयुक्त आहार कसा घ्यावा, कोणत्या पदार्थाचा आहारात समावेश करावा,
अंडी –
अंडी प्रोटिन्सचा उत्तम स्त्रोत आहे. अंड्यामध्ये व्हिटॅमिन्स, आयर्न, फॅट्स आणि डोळे निरोगी ठेवणारे ऍटिऑक्सिडंट असतात. तुम्ही अंडी उकडून किंवा ऑम्लेट बनवून खाऊ शकता.
दूध –
कॅल्शियमयुक्त आहार म्हणजे दूध असे म्हटले जाते. दूधात केवळ कॅल्शियमच नाही तर प्रोटिन्स मुबलक प्रमाणात आढळतात. तुम्ही शरीरातील प्रोटिन्सची कमतरता भरुन काढण्यासाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करावा.
सोयाबिन –
प्रोटिन्सचा उत्तम स्त्रोत म्हणून सोयाबिनची ओळख आहे. तुम्ही जर शाकाहारी असाल तर सोयाबिनचा आहारात समावेश करावा.
ओट्स –
अनेक जणांना सकाळच्या नाष्ट्यात ओट्स खाण्याची सवय असते. हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करणारे ओट्स आवर्जून खातात. याच्या सेवनाने शरीराल प्रोटीन मिळते.
मटार –
थंडीच्या मोसमात मटार बाजारात मिळू लागतात. मटार प्रोटिन्सचा उत्तम स्त्रोत आहे. मटारपासून तुम्ही विविध डिशेस बनवून खाऊ शकता.
पनीर –
पनीरमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन आढळते. त्यामुळे आहारात प्रोटीनचा समावेश करता येईल. शाकाहारी व्यक्तींना यातून अधिक प्रमाणात प्रोटीन मिळवता येते.
मसूर डाळ –
मसूर डाळीचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. या डाळीत प्रोटिन्सव्यतिरीकत् फायबर मुबलक प्रमाणात आढळते. ज्यामुळे आतड्यांमध्ये निरोगी बॅक्टेरीया राखण्यास मदत होते.
हेही पाहा –