Monday, January 20, 2025
HomeमानिनीWomen Health : मासिक पाळीदरम्यान व्यायाम करावा की नाही?

Women Health : मासिक पाळीदरम्यान व्यायाम करावा की नाही?

Subscribe

दर महिन्याला येणारी मासिक पाळीदरम्यान महिलांना हार्मोन बदलांमुळं पोटदुखीपासून चिडचिड, थकवा आणि असंख्य बदलांना सामोरं जावं लागतं. मासिक पाळीदरम्यान विश्रांती हवी हे मान्य आहे पण अजिबातच हालचाल करू नये असे कुणीही म्हटलेले नाही. उलट मासिक पाळी दरम्यान व्यायाम करणे फायदेशीर ठरते. पण तरीदेखील प्रत्येक स्त्रीचे शरीर वेगळे असल्याने शरीराला अनुकूल गोष्टी करणे योग्य ठरते.

आरोग्य तज्ञांच्या मते, तुम्ही मासिक पाळी दरम्यान व्यायाम करू शकता. पण, हार्ड वर्कआऊट करणं टाळा. जास्त वेळ व्यायाम करणे देखील तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही. सामान्य व्यायाम केल्यास तुम्हाला दुखण्यापासून नक्कीच आराम मिळेल. पण जास्त व्यायामामुळे तुमच्या शरीरात क्रॅम्प्स, स्नायू दुखणे, थकवा  जाणवू शकतो. मासिक पाळी दरम्यान जास्त व्यायाम केल्याने कंबर आणि ओटीपोटात वेदना वाढू शकतात. त्यामुळे शक्यतो मासिक पाळीत हलका व्यायाम करा.

  • मासिक पाळीत नियमित व्यायाम केल्याने तुमचा आळस आणि थकवा दूर होईल. याशिवाय मूड स्विंगच्या समस्याही काही प्रमाणात दूर होतात.
  • मासिक पाळीदरम्यान तणाव आणि चिडचिडेपणाची समस्या असल्यास अशा लोकांनी व्यायाम केल्यास ही समस्याही दूर होऊ शकते.
  • मासिक पाळीत स्तनाची सूज देखील व्यायामाने कमी होते. बर्‍याच महिलांना मासिक पाळीत जास्त भूक लागते, त्यामुळे जेव्हा त्या व्यायाम करतात तेव्हा खाण्याच्या विकारावर काही प्रमाणात नियंत्रण होते.

या गोष्टींची काळजी घ्या

  • मासिक पाळीत चुकूनही रिकाम्या पोटी व्यायाम करू नका.
  • जेवल्यानंतर लगेच व्यायाम करू नका. पण जेवल्यानंतर काही तासांनी व्यायाम सुरू करा.
  • मासिक पाळीच्या वेळी सैल कपडे घालून व्यायाम करा.
  • शरीर जास्त ताणू नका.

 


Edited By : Nikita Shinde

Manini