Thursday, June 8, 2023
घर मानिनी Fashion Lingerie- मैत्रिणींनो तुमच्या लॉंजरी कलेक्शनमध्ये असायलाच हव्यात 'या' गोष्टी

Lingerie- मैत्रिणींनो तुमच्या लॉंजरी कलेक्शनमध्ये असायलाच हव्यात ‘या’ गोष्टी

Subscribe

स्मार्ट वुमनची फर्स्ट चॉइस ही उत्तम फिटिंग असणारी स्मार्ट लाँजरी. तर तुमचे अंडरगारमेंट्स योग्य नसतील तर तुम्ही घातलेले कपडे सुद्धा अंगावर घातल्यानंतर विचित्र दिसतात. खरंतर तरुण मुलींसह महिलांना सुद्धा आपल्या लाँजरीची योग्य साइज माहिती असली पाहिजे. इंडियन ड्रेसेस घालायचे असतील अथवा वेस्टर्न आउटफिट तर योग्य प्रकारची ब्रा घालणे फार महत्वाचे असते.

सध्या मार्केटमध्ये विविध प्रकारच्या लाँजरी या प्रत्येक वयोगटातील महिलांसाठी तयार केल्या जातात. तुमचे वय, बॉडी शेप, आकार ऐवढेच नव्हे तर कस्टमाइज इनरवेअर सुद्धा तुम्हाला मिळतात. मैत्रिणींनो तुमच्या लॉंजरी कलेक्शनमध्ये असायलाच हव्यात ‘या’ गोष्टी.

- Advertisement -

-बेसिक बॅकलेस ब्रा


ही ब्रा विविध रंगाची आणि स्टाइल्सची मिळते. खासकरुन ऑफ शोल्डर, लो बॅक, की होल बॅक, बॅकलेस ब्लाउज सोबत तुम्ही अशा पद्धतीची ब्रा घालू शकता. जेणेकरुन तुमच्या ब्रा ची पट्टी दिसणार नाही.

- Advertisement -

-कर्व कलेक्शन ब्रा


प्रेग्नेंसीनंतर, वय वाढल्यानंतर किंवा हार्मोनल समस्यांमुळे महिलांचे वजन वाढते. अशा महिलांनी नेहमीच ब्रेस्टच्या कपच्या साइजनुसारच ब्रा निवडावी. कर्व कलेक्शन मध्ये डी आणि ई कप उपलब्ध असतात. जे ब्रेस्टला फुल कवरेज देते आणि तुम्ही कंम्फर्टेबल राहता.

-अॅक्टिव्हवेअर लाँजरी


जर तुम्ही फिटनेस फ्रिक असाल तर तुमच्या कलेक्शनमध्ये अॅक्टिव्हवेअर लाँजरी जरुर असावी. खासकरुन अशा तरुणींकडे ज्या हाय इंटेंसिव वर्कआउट करतात. अॅक्टिव्हवेअर लॉन्जरीचे फॅब्रिकमधून लगेच घाम शोषून घेतला जातो. त्याचसोबत त्याचे डिझाइन असे असावे की, वर्कआउटवेळी तु्मच्या शरिराला संपूर्ण सपोर्ट करेल. अशा प्रकारच्या कलेक्शनमध्ये ब्रा, जॉगर्सचा सुद्धा समावेश असतो.

-शेपवेअर


एखाद्याचे शरिर परफेक्ट शेपमध्ये नसते. काही जणांचे पोट, बॅक अथवा मांड्या या चब्बी असू शकतात. अशातत त्यांना एखादा ड्रेस घालताना समस्या येते. अशावेळी तुम्ही शेअपवेअरचा वापर करु शकता. एक उत्तम शेपवेअर तुम्हाला शेप मध्ये दिसण्यास मदत करेल. या कलेक्शनमध्ये मिनिमाइजर्स, टमी टकर्स आणि साडी शेपर सारखे प्रोडक्ट्स येतात.

-हिपस्टर पँन्टीज

 
जर तुम्ही घट्ट जीन्स किंवा ट्राउजर्स घालणार असेल तर तुमच्या पँन्टीची लाइनिंग दिसते. अशावेळी तुम्ही योग्य प्रकारची पँन्टीज निवडली पाहिजे. हिपस्टर पँन्टीज तुम्ही घालू शकता. त्या बॉडी हगिंगसह कंम्फर्टेबल ही असतात.


हेही वाचा- Best female perfumes : महिलांकडे ‘हे’ 5 perfumes असायलाच हवेत

- Advertisment -

Manini