Saturday, April 20, 2024
घरमानिनीHealthपुरुषांच्या तुलनेत महिलांना का असते जास्त झोपेची गरज

पुरुषांच्या तुलनेत महिलांना का असते जास्त झोपेची गरज

Subscribe

हे बोलणे चुकीचे ठरणार नाही की, महिला या परिवारातील अन्य सदस्यांपेक्षा कमी प्रमाणात आराम करतात. ऐवढेच नव्हे तर याचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर ही होतो. ज्या महिला ऑफिस ते घर असे सर्व सांभाळते तिला नेहमीच आपल्या झोपेशी तडजोड करावी लागते. एरियलच्या एका सर्वेनुसार 71 टक्के महिलांना घरातील कामामुळे पुरेशी झोप घेता येत नाही. (Women and sleep)

CDC च्या एका रिपोर्टनुसार 19 ते 60 वयातील लोकांनी कमीत कमी 7 तासांची झोप घ्यावी लागते. 13-18 वयातील लोकांना कमीत कमी 8 ते 10 तासांची झोप, तर 6-12 वयोगटातील मुलांसाठी 9 ते 12 तासांची झोप घेणे फार गरेजेचे आहे.

- Advertisement -

स्लीप फाउंडेशननुसार पुरुषांच्या तुलनेत महिलांनी 11 मिनिट अधिक झोपावे. कारण महिलांचा मेंदू पुरुषांच्या तुलनेत अधिक मेहनत करतात. या व्यतिरिक्त महिलांचे शेड्युल अधिक व्यस्त असते. त्या केवळ लवकरच उठत नाही तर मुलांची काळजी घेणे, घरातील काम, ऑफिस अशा सर्व गोष्टी सांभाळत असते. अशातच त्यांना अधिक आरामाची गरज असते. (Women and sleep)

- Advertisement -

महिलांचे वजन पुरुषांच्या तुलनेत वेगाने वाढते. हे एक मोठे कारम आहे की, लठ्ठपणामुले महिलांची कमी झोप होते. यामुळे त्या तणावाखाली जातात. तसेच पीरियड्सचे दिवस असो किंवा प्रेग्नेंसीचा महिना, या दरम्यान महिलांचे हार्मोन्स फार वेगाने बदलतात. याच कारणास्तव त्यांना भरपूर झोपेची सुद्धा गरज असते. एनसीबीआयच्या एका रिपोर्टनुसार ज्या महिला रेस्टलेस लेग सिंड्रोमने पीडित असतात त्यांना रात्री व्यवस्थितीत झोप लागत नाही.


हेही वाचा- हवामान आणि झोपेचं आहे थेट connection

- Advertisment -

Manini