Friday, April 26, 2024
घरमानिनीHealthधुम्रपान करणाऱ्या महिलांनो सावधान, सेक्शुअल लाइफवर होतो थेट परिणाम

धुम्रपान करणाऱ्या महिलांनो सावधान, सेक्शुअल लाइफवर होतो थेट परिणाम

Subscribe

आजकालच्या बदलत्या लाइफस्टाइलमुशे महिला सुद्धा धुम्रपान अधिक प्रमाणात करु लागल्या आहेत. काही महिला तर स्मोकिंगकडे आकर्षित होत कमी वयातच याची सवय स्वत:ला लावून घेतात. परंतु याचा नंतर गंभीर परिणामांचा सामना करावा लागतो. खरंतर सिगरेट पिण्याचे परिणाम पुरुषांमध्ये दिसतातच. पण महिलांमध्ये याचा परिणाम प्रेग्नेंसीवेळी फार गंभीर दिसतो. यामुळे बाळ आणि आईच्या आयुष्यावर ही होतो. यामध्ये दोघांचा सुद्धा मृत्यू होऊ शकतो. अशातच महिलांनी धुम्रपान करणे फार धोकादायक मानले जाते. त्याचसोबत त्यांची सेक्शुअल लाइफ सुद्धा प्रभावित होते. आम्ही तुम्हाला महिलांनी धुम्रपान केल्याने त्यांच्यामध्ये कोणती लक्षणं दिसून येतात याच बद्दल सांगणार आहोत.

-फर्टिलिटी कमी होते
CDC च्यानुसार, ज्या महिला सिगरेट पितात त्यांची फर्टिलिटी वेगाने कमी होते. याच कारणामुळे त्या लवकर कंसीव करु शकत नाहीत. त्याचसोबत महिलांमध्ये प्रेग्नेंसी दरम्यान काही समस्या येतात.

- Advertisement -

-कामुकतेची कमतरता
धुम्रपान करणाऱ्या महिलांमध्ये दुसऱ्या महिलांच्या तुलनेत सेक्स करण्याची इच्छा कमी होते. असे सिगरेट मध्ये असलेल्या निकोटिनच्या कारणास्तव होते. पण हे लक्षण अचानक वाढलेल्या सेक्स ड्राइव वाढतो आणि हळूहळू कमी होत जातो.

- Advertisement -

-मेनोपॉज लवकर येतो
सिगरेट पिणाऱ्या महिलांमध्ये मर्यादित काळाच्या आधीच मेनोपॉजला सुरुवात होते. त्याचसोबत या दरम्यान गंभीर लक्षण सुद्धा दिसण्याची शक्यता अधिक असते.

-धुम्रपान करणाऱ्या महिलांमध्ये दिसणारी अन्य लक्षणं
धुम्रपान ओवेरियन रिजर्व कमी करतो. ज्यामुळे महिलेच्या योनित कोरडेपणा आणि सेक्स करताना फार दुखते. या व्यतिरिक्त अशा महिलांचे वेगाने हार्मोनल बदल होतात. त्यामुळे PCOS, अनियमित पिरियड्सची समस्या निर्माण होऊ शकते.


हेही वाचा- पेल्विक इंफ्लेमेटरी डिजीजचा फर्टिलिटीवर होतो असा परिणाम

- Advertisment -

Manini