Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल Single राहण्यास महिलांची पसंती

Single राहण्यास महिलांची पसंती

Subscribe

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की, पुरुषांच्या तुलनेत महिला सिंगल राहणे अधिक पसंद करतात. डेटा अॅनालिस्ट मिंटेल द्वारे झालेल्या या अभ्यासाच्या रिपोर्टनुसार, जेथे 49 टक्के पुरुष आपल्या सिंगल स्टेटसमुळे आनंदित नाहीत तेथे 61 टक्के महिला सिंगल राहणे पसंद करतात.

स्टडीमध्ये असा सुद्धा दावा करण्यात आला आहे की, सिंगल महिलांमध्ये जवळजवळ 75 टक्के महिला अशा असतात ज्या काही वर्ष तरी पार्टनर शोधत नाहीत. तर महिलांच्या तुलनेत अशा पुरुषांची संख्य 65 टक्के आहे.

- Advertisement -

स्टडीच्या निष्कर्षावरुन असे समोर आले आहे की, पुरुषांच्या तुलनेत महिलांना अधिक काम आणि मेहनत करावी लागते. रिलेशनशिप तज्ञांच्या मते, महिला रिलेशनशिपसह घरातील कामे, जेवण बनवणे, परिवाराची काळजी घेणे अशा गोष्टींमध्ये फार व्यस्त होऊन जाते. त्यामुळेच रिलेशनशिपमधील गोडवा कालांतराने त्यांच्यामधील कमी होतो. त्याचसोबत त्यांनी असे ही म्हटले की, महिलांना आपल्या मित्रपरिवारासोबत अधिक वेळ घालवणे आवडते. तर पुरुषांना आपल्या पार्टनरसोबतच रहावे असे वाटते. ॉ

परंतु महिलांना खरंच स्वतंत्र आणि सिंगल राहणेच आवडते हे स्टडीमधून समोर आले आहे. महिलांना आपल्या इच्छेनुसार जगावेसे वाटते. त्याचसोबत त्यांना कोणत्याही पार्टनरची गरज भासत नाही. यापूर्वीच्या स्टडीमधून सुद्धा असे समोर आलेय की, ज्या महिला सिंगल असतात त्यांचे फार मित्र असतात. त्या स्वत:ला सोशली अॅक्टिव्ह ठेवतात. तर सिंगल पुरुष अधिक मित्र बनवण्याकडे अधिक वळतात. ना अधिक सोशली अॅक्टिव्ह राहतात.


- Advertisement -

हेही वाचा- मैत्रिणींनो अशी घ्या मानसिक आरोग्याची काळजी

- Advertisment -