Friday, April 26, 2024
घरमानिनीWomen’s day 2023 : 'या' आहेत भारतातील 4 सर्वात शक्तिशाली महिला

Women’s day 2023 : ‘या’ आहेत भारतातील 4 सर्वात शक्तिशाली महिला

Subscribe

दरवर्षी जागतिक महिला दिन ८ मार्चला साजरा केला जातो. महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्याबरोबरच त्यांची समाजातील ओळख अधोरेखीत करण्यासाठी महिला दिन जगभऱात साजरा केला जातो. यादिवशी विविध कार्यक्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांचा गौरव केला जातो. त्यांना सन्मानित केले जाते. इतर महिलांना त्यातून प्रेरणा मिळावी हा त्यामागचा हेतू असतो. महिलांना भेटवस्तू दिल्या जातात. अशातच फोब्सने 2022 मधील सर्वात शक्तिशाली महिलांची यादी जाहीर केली आहे. जागतिक महिला दिनानिमित्त आपण जगातील 5 सर्वात शक्तिशाली महिलांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या नेहमीच चर्चेत असतात.

‘या’ आहेत जगातील 4 सर्वात शक्तिशाली महिला

निर्मला सीतारामन

- Advertisement -

वित्त मंत्री निर्मला सीतारमण ने वित्त वर्ष 2022-23 के लिए जम्मू-कश्मीर के  लिए 1.42 लाख करोड़ रुपये का बजट पेश किया |

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे नाव सलग चौथ्यांदा जगातील 100 शक्तिशाली महिलांच्या यादीत आले आहे. त्या यादीत 36 व्या क्रमांकावर आहेत. निर्मला सीतारामन या देशाच्या पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री आहेत ज्या सतत वित्तविषयक बाबी हाताळत आहेत. याआधीही त्यांनी देशाच्या संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली आहे.

- Advertisement -

किरण मुझुमदार – शॉ

Wealthy Women List : रोशनी नादर भारतातील सर्वात श्रीमंत महिला, NYKAA च्या  फाल्गुनी नायरने किरण मुझुमदार शॉ यांना टाकले मागे - Majha Paper

किरण मुझुमदार शॉ या भारतातील सर्वात मोठ्या सूचीबद्ध बायोफार्मास्युटिकल कंपनीच्या बायोकॉनची संस्थापिका आहेत. त्यांची फार्मास्युटिकल उत्पादन क्षेत्रात ही एक मोठी कंपनी आहे. या कंपनीची स्थापना 1978 मध्ये झाली. किरण मुझुमदार या भारतातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहेत. त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

फाल्गुनी नायर

50 की उम्र में छोड़ा 25 साल का करियर, फाल्गुनी नायर सक्सेस के लिए इन फंडों  को अपना कर बनीं बिलेनियर | Falguni Nair left a career of 25 years at the

Nykaa च्या संस्थापिका फाल्गुनी नायर यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1963 रोजी मुंबईमध्ये येथे झाला. फाल्गुनी नायर या एक व्यावसायिक महिला आहेत ज्यांची कंपनी आज देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. फाल्गुनी नायर देशातील सर्वात श्रीमंत महिला आहेत.

कमला हॅरिस

Kamala Harris Slams Donald Trump US Administration On Coronavirus Vaccine  US Elections 2020 - अगर डोनाल्ड ट्रम्प कोरोना वैक्सीन लेने को कहेंगे, तो  मैं नहीं लूंगी : कमला हैरिस | World News ...

कमला हॅरिसचे नाव जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत समाविष्ट आहे. कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक आहेत, त्या सध्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपती म्हणून कार्यरत आहेत. कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी नियुक्त झालेल्या पहिल्या आशियाई अमेरिकन महिला आहेत.


हेही वाचा :

Women’s Day : जागतिक महिला दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या यंदाची थीम

- Advertisment -

Manini