Thursday, January 23, 2025
HomeमानिनीWomen’s day 2024 : 'वूमन्स डे'ला फिरण्याचा प्लॅन करताय? बिनधास्त जा 'या'...

Women’s day 2024 : ‘वूमन्स डे’ला फिरण्याचा प्लॅन करताय? बिनधास्त जा ‘या’ ठिकाणी

Subscribe

आजही महिलांना एकट्याने प्रवास करायचे म्हटले की, अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. यातील सर्वात महत्वाचे म्हणजे सुरक्षिततेचे आव्हान. आजच्या युगात महिला सक्षम झाल्या असल्या तरी महिलेने ट्रिप ला जायचे म्हटले घरातील मंडळी असो व ती स्वतः अनेक विचार मनात घर करू लागतात आणि ठरवलेला प्लॅन अनेकदा कॅन्सल होतो. या वर्षी वूमन्स डे ला तुम्ही सुद्धा गर्ल्स गँगसोबत फिरण्याचा प्लॅन करत असाल आणि ठिकाण ठरले नसेल तर बातमी तुमच्यासाठी. आज आम्ही तुम्हाला अशी काही ठिकाणे सांगणार आहोत जि महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत योग्य मानण्यात आली आहेत.

लवासा –
पुण्यापासून ६५ किमी अंतरावर लवासा एक बांधलेले शहर आहे, जे इटालियन शहर पोर्टोफिनोपासून प्रेरित आहे. गर्ल्स गँगसोबत विकेंड घालविण्यासाठी

कुफरी –
हिमाचल प्रदेशातील शिमल्याजवळीत छोटेसे हिल स्टेशन म्हणजे कुफरी. कुफरीमध्ये सुंदर तलाव, बर्फाच्छादित पर्वत आणि अनेक नयनरम्य दृश्य तुम्हला पाहायला मिळतील. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हिमाचलमधील कुफरी हे ठिकाण उत्तम पर्याय आहे.

मुन्नार –
मुन्नार भारतातील सर्वात सुरक्षित पर्यटनस्थळांपैकी एक आहे. मुन्नार नैसर्गिक सौंदर्यासाठी अतिशय लोकप्रिय आहे. महिला येथे कोणत्याही टेन्शन शिवाय बिनधास्त फिरू शकतात. महिला प्रवाशांसाठी मुन्नार हा बेस्ट ऑप्शन आहे.

जयपूर –
गुलाबी शहर म्हणून ओळखले जाणारे जयपूर महिलांसाठी सुरक्षिततेच्या मानाने अत्यंत योग्य आहे. जयपूरमध्ये तुम्ही हवा महाल, जल महाल, सिटी पॅलेस, आमेर किल्ला, जंतरमंतर, नाहरगड किल्ला, जयगड किल्ला, बिर्ला मंदिर आदी ठिकाणे पाहू शकतात. लवासा पश्चिम घाटाने वेढलेला आहे.

दार्जिलिंग –
पश्चिम बंगाल मधील दार्जिलिंग शहराला डोंगराची राणी असे म्हटले जाते. दार्जिलिंग हे महिलांच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. येथे तुम्हाला बौद्ध मठ, प्राणिसंग्रहालय पाहायला मिळतील. याशिवाय येथे तुम्हाला टॉय ट्रेनचाही आनंद मिळू शकतो.

नैनिताल –
उत्तराखंड हे देशातील सुरक्षित ठिकांणांपैकी एक मानले जाते. अशा परिस्थितीत तुम्ही येथे फिरायला जाऊ शकता. नैनितालमध्ये तुम्ही घोडेस्वारी, कॅम्पिंग आणि ट्रेकिंग करू शकता.

लडाख –
लडाख हे महिलांसाठी उत्तम ठिकाण आहे. येथे आल्यावर मोठमोठे बर्फाच्छादित पर्वत, सुंदर दऱ्या यामुळे निसर्ग सौंदर्य काय आहे याची तुम्हाला जाणीव होईल. डेस्कीट मठ, नुब्रा व्हॅली, उंटांची सवारी येथे अनुभवता येईल.

 

 


हेही वाचा : Women’s day 2024 : महिला दिनाची सुरुवात कशी झाली? जाणून घ्या यंदाची थीम

Manini