कोणत्याही गुलाबी रंगाची वस्तू दिसताच आपण लगेचच अंदाज बांधतो की, वस्तू स्त्रीचीच असणार आहे. आजपर्यत गुलाबी ओंठावर आणि गुलाबी गालांवर अनेक गाणी बनवण्यात आली आहेत. पण, तुम्ही कधी हा विचार केला आहे का की गुलाबी रंग हा महिलांशी संबंधितच का? गुलाबी रंग फक्त महिलांची ओळख पटवण्यासाठीच का वापरला जातो? आज गुलाबी रंग हा स्त्रीत्वाचे प्रतीक मानले जाते, पण, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, एकेकाळी गुलाबी रंग पुरुषांची ओळख असायचा? आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त जाणून घेऊयात पुरुषांची ओळख असलेला हा गुलाबी रंग महिलांची ओळख कसा झाला.
गुलाबी रंगाचा इतिहास –
18 व्या शतकात गुलाबी रंग लिंगाशी संबंधित नव्हता. युरोपमध्ये गुलाबी रंग हा शक्ती आणि उत्कटतेचे प्रतीक मानले जायचे. पूर्वी ह्या रंगाचे कपडे पुरुष आणि स्त्रिया दोघेही परिधान करायचे.
लिंगाशी रंगाना जोडण्याची सुरुवात 19 व्या शतकात झाली. या काळात, मुलांच्या कपड्यांमधील रंग लिंगानुसार निवडले जाऊ लागले. गुलाबी रंग मुलाशी संबंधित होता तर निळा रंग कोमलतेचे प्रतीक मानले जायचे, त्यामुळे मुलींचा ठरवण्यात आला. 20 व्या शतकात पुन्हा या संकल्पनेत बदल करण्यात आला आणि 1940-50 च्या काळात गुलाबी रंग हा महिला शक्ती आणि एकतेचे प्रतिक मानले जाऊ लागला. खरं तर, यामागचे मुख्य कारण मार्केटिंग होते. कंपन्यानी महिलांसाठी बनवलेल्या प्रॉडक्टमध्ये गुलाबी रंग वापरण्यात आवा आणि त्यांची ओळख बनला.
आज गुलाबी रंग महिला, कोमलता आणि स्त्रीत्वाशी संबंधित आहे. पण, बदलत्या काळानुसार आता गुलाबी रंग सर्व लिंगासाठी वापरला जातो.
हेही पाहा –