आजकाल लोक किचनमधील भांडी स्टिल किंवा प्लास्टिक ऐवजी लाकडाची अथवा मातीची वापरतात. स्टिल-प्लास्टिकची स्वच्छता करणे सोपे असते. मात्र लाकडाच्या वस्तूंची स्वच्छता करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अशातच जर तुम्ही लाकडाचा मसाल्याचा डब्बा वापरत असाल तर कोणत्या टीप्स वापराव्यात याच बद्दल आपण पाहणार आहोत.
मसाल्याचा डब्बा स्वच्छ करण्यासाठी ओल्या कापडाचा वापर करा
-मसाल्याचा डब्बा स्वच्छ करण्यासाठी स्वच्छ कपडा घेऊन तो थोडा ओलसर करा. अधिक ओलसर कापडाने पुसण्याऐवजी तो पिळून घेऊन आतमधील भाग व्यवस्थितीत पुसून घ्या.
-पुसल्यानंतर उन किंवा हवेखाली सुकण्यासाठी ठेवा. जेणेकरुन ओलसरपणा राहणार नाही. जेणेकरुन मसाल्याचा डब्बा खराब होणार नाही.
-लाकडाच्या मसाल्याच्या डब्ब्याला डाग लागले असतील तर व्हिनेगरचा वापर करू शकता. यासाठी एक कप पाण्यात दोन चमचा व्हिनेगर टाका. -आता ते स्प्रे बॉटलमध्ये टाकून डबा बाहेरून आतमधून स्प्रे करा.
-असे केल्यानंतर ब्रश किंवा कापडाच्या मदतीने स्वच्छ करा. स्वच्छ पाण्याने पुसल्यानंतर उन्हात किंवा ड्रायरने सुकवा.
अन्य काही टीप्स
-लाकडाचा मसाला डब्बा स्वच्छ करायचा असेल तर त्यासाठी कमी पाण्याचा वापर करा
-पाण्याने पुसल्यानंतर डब्बा कमीत कमी दोन-तीन तास उन्हात सुकण्यासाठी ठेवा
-डब्ब्यातील ओलसरपणा दूर करा. अन्यथा मसाले खराब होऊ शकतात
-मसाल्याचे डब्बे नेहमीच ओलसर भांड्यांपासून दूर ठेवा
-मसाल्याचा डब्बा गॅस पासून दूर ठेवा
हेही वाचा- कुकरचा रबर सैल झाला असेल तर वापरा ‘या’ टिप्स