घरनवरात्रौत्सव 2022नवरात्रीत चनिया चोलीसोबत लोकरीच्या दागिन्यांची क्रेझ

नवरात्रीत चनिया चोलीसोबत लोकरीच्या दागिन्यांची क्रेझ

Subscribe

नाशिक : नवरात्र उत्सव जल्लोषात सर्वत्र साजरा होत आहे बाजारात चनिया चोलीसोबतच विविध प्रकारच्या लोकर, मोत्यांसह ऑक्सिडाइस्ड दागिन्यांचा हटके ट्रेण्ड दिसून येतो आहे. महिला वर्ग नेहमी त्यांच्या वेशभूषेला साजेशा दागिन्यांना प्राधान्य देतात. सध्या ऑक्सिडाइस्ड दागिन्यांचा ट्रेंड अतिशय प्रचलित आहे. शिवाय ऑक्सिडाइज्ड दागिने हे कुठल्याही पोशाखावर अगदी उत्तम व आकर्षक दिसतात. विविध प्रकारच्या अ‍ॅक्सेसरीज बाजारात उपलब्ध झाल्यामुळे महिलावर्ग लहान व मोठ्या म्हणजेच लांब व छोट्या आकाराच्या डिझाईन असलेल्या दागिन्यांना प्राधान्य देताना दिसून येत आहे. शिवाय हे ऑक्सिडाईज्ड दागिने विविध प्रकारच्या रंगीबिरंगी खडांपासून बनलेले असतात. त्यामुळे ते अधिक आकर्षक वाटतात.

ऑक्सिडाइस्ड दागिन्यांमध्ये मंगळसूत्र, बांगड्या, नेकलेस, अंगठी, पैंजण असे विविध प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. शिवाय ते खिशाला परवडणारे असल्यामुळे महिला वर्ग मोठ्या प्रमाणात त्याला पसंती देत आहेत. विविध रंगांच्या लोकरीच्या धाग्यांत क्रोशा सुईवर विणून तयार केलेल्या या ज्वेलरीचा ट्रेण्ड भारतातच नाही तर जगभरात हीट झाला आहे. मध्यंतरात धागा, लोकर यांपासून तयार केलेल्या गोंडा ज्वेलरीचा ट्रेण्ड होता. त्याची जागा आता या क्रोशा ज्वेलरीने घेतला आहे. या ज्वेलरीने यंदाही चांगलीच पसंती मिळवली आहे.

- Advertisement -
वजनाला हलके

क्रोशा ज्वेलरी तरुणींच्या पसंतीस उतरण्याचे प्रमुख कारण म्हणजे तिचे हलके-फुलके असणे. लोकर, धाग्यांपासून विणलेल्या या दागिन्यांमुळे भन्नाट मॅचिंग कॉम्बिनेशन जुळून येते. धातूच्या दागिन्यांमुळे कानांच्या पाळ्यांवर जो ताण येतो, तो या दागिन्यांमुळे येत नाही. त्यामुळे हे दागिने दिवसभर मिरवता येतात.

ऑक्सिडाईज्ड दागिन्यांचे दर असे

मंगळसूत्र-300, बांगड्या-250, नेकलेस- 250, अंगठी-150, पैंजण-250 अशा आहेत. शिवाय हे दागिने कुठल्याही पोशाखावर मॅच होत असल्याने महिलावर्ग मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -