घरताज्या घडामोडीLockDown: घरी बेडवर बसून काम करणे महागात पडेल!

LockDown: घरी बेडवर बसून काम करणे महागात पडेल!

Subscribe

सध्या कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक जण आपले काम घरी बसून करत आहेत. त्यामुळे काम करत असतात इलेक्ट्रिकल वस्तूपासून स्वतःची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. घरामध्ये कामादरम्यान विद्युत उपकरणे वापरताना एक्सटेंशन बोर्डवर ओव्हरलोड येऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. एकाच एक्सटेंशन बोर्डमधील प्लग मधून अनेक वायर्स घसवून त्याचा वापर करू नका. अशा बेजबाबदार पणामुळे शॉर्ट सर्किट होऊ शकतो आणि आग लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

नॅशनल फायर कौन्सिलने असा इशार दिला की, अनेक लोक घरी काम करत असल्यामुळे तात्पुरते विद्युत सेटअप तयार करतात. त्यामुळे आग लागण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे घराच फायर अलार्म लावा किंवा आग लागल्याच्या परिस्थिती काय करावं? याबाबत सल्ला घ्यावा. तसंच घरात असलेल्या इलेक्ट्रिक वस्तूकडे जास्त लक्ष द्या.

- Advertisement -

घरात काम करणाऱ्या वाईट सवयी ३००० लोकांवर केलेल्या सर्वेक्षणातून उघडकीस आल्या आहेत. काही लोक काम करता किंवा काम झाल्यावर लॅपटॉप आणि फोन चार्ज करताना बेड किंवा अंथरुणावर ठेवतात. मात्र त्यामुळे जास्त आग लागण्याची आणि शॉक लागण्याची शक्यता असते. इलेक्ट्रिकल सेफ्टी हे खूप महत्त्वाची असते. त्यामुळे कामाला सुरुवात करण्यापूर्वी इलेक्ट्रिक सेटअप नीट पाहून घ्या. आपल्या एक्सटेंशन बोर्ड ओव्हरलोड होईल असं काही करू नका. घरात असलेल्या वेगवेगळ्या सॉकेटचा वापर करा.

तसंच नुकत्याच केलेल्या या सर्वेक्षणानुसार, घरी काम करताना एक्सटेंशन बोर्डवर ओव्हरलोड दिला की आगीचा लागू शकते हे फक्त तीन पैकी एकाच व्यक्तीला माहिती नव्हते. तसंच ४४ टक्के लोकांनी असं सांगितलं की, त्याच्या एक्सटेंशवर बोर्डमधल्या वायर्स या एकमेकांशी जोडलेल्या असतात. मात्र यामुळे शॉर्ट सर्किट होण्याची आणि आग लागण्याची जास्त शक्यता असते.

घरात काम करताना ही काळजी घ्या 

  • कोणतही उपकरणाला चार्जिंग करताना अनेक वायर्सचा गुंता करू नये.
  • बेड किंवा अंथरुणावर कोणतेही उपकरण चार्जिंग करत ठेऊ नका.
  • एका एक्सटेंशन बोर्डमध्ये अनेक प्लग लावू नये.
  • आग लागल्यास घराबाहेर पळण्याच्या मार्ग तयार करून ठेवा.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -