Tuesday, May 30, 2023
घर मानिनी Food वर्किंग वुमेनसाठी संपूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन

वर्किंग वुमेनसाठी संपूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन

Subscribe

महिला घरातील सर्वांची खाण्यापिण्याची काळजी घेते. परंतु जेव्हा आरोग्याचा मुद्दा येतो तेव्हा नेहमीच दुर्लक्ष केले जाते. आजच्या काळात महिला घर आणि ऑफिसची कामे उत्तमपणे संभाळतात. अशातच आपल्या डाएटकडे सुद्धा लक्ष देणे फार गरेजेचे आहे. सर्वकाही मॅनेज करणे आणि योग्य डाएट न घेतल्याने महिलांना थकवा, शरिरात त्राण नसणे आणि अन्य प्रकारच्या समस्या होऊ लागतात. दिवसभर शरिरात उर्जा टिकून राहण्यासाठी डाएटमध्ये पोषक तत्वांचा समावेश असणे फार गरजेचे आहे. अशातच आम्ही तु्म्हाला वर्किंग वुमेनसाठी एका दिवसाचा डाएट प्लॅन सांगणार आहोत. या डाएटमध्ये न्युट्रिशन योग्य प्रमाणात असणार आहेत हे लक्षात ठेवा.

दिवसाची सुरुवात

- Advertisement -


सकाळी उठल्यानंतर आवळा आणि आल्याचा ज्यूस प्या. त्याचसोबत 5-7 भिजवलेले बदाम खा. बॉडी डिटॉक्स करण्यासाठी ते रोगप्रतिकाराक शक्ती वाढण्यापर्यंत हे ड्रिंक फायदेशीर ठरणार आहे. बदाम रोगप्रतिकारक शक्ती बूस्ट करतात. त्याचसोबत डाइजेशनसाठी सुद्धा फायदेशीर असतात.

ब्रेकफास्ट

- Advertisement -


ब्रेकफास्टसाठी खुप पर्याय आहेत. तुम्ही चिया सीड्स आणि फूड्स सोहत ओट्स ही खाऊ शकतात. अन्यथा मिक्स दाल पराठा, उपमा किंवा स्क्रॅम्बल्ड एग बनवून खाऊ शकता. यामुळे तुमचे पोट भरलेले राहिल.

मिड मॉर्निंग


मिड मॉर्निंगसाठी तुम्ही कोणत्याही फळाचा ज्यूस पिऊ शकता. फळांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. एखादे सीजनल फ्रुटचा सुद्धा तुमच्या डाएटमध्ये समावेश करु शकता.

लंच


लंचसाठी तुम्ही रायता आणि सलाडसोबत लेमन राइस, भाजी सोबत नाचणीची भाकरी किंव दाल खिचडी खाऊ शकता. लंचसाठी अन्य ऑप्शन ही तुमच्याके आहेच. यामध्ये मात्र न्युट्रिशन्स असावेत याची काळजी घ्यावी.

स्नॅक


संध्याकाळच्या नाश्यात्यात सोया किंवा आलमंड मिल्क कॉफीसोबत खाखरा किंवा मखाना खाऊ शकतात. संध्याकाळसाठी तुम्ही अनहेल्थी खाण्याऐवजी हा पर्याय निवडू शकता.

डिनर


डिनरसाठी मुगाच्या डाळीची खिचडी किंवा दाल-राइस अथवा सूप पिऊ शकता. पोस्ट डिनरच्यावेळी एखादे हेल्दी ड्रिंक. जसे की, बडीशेपचे पाणी प्या.


हेही वाचा- Pumpkin Peel Milk Chutney : दुधी भोपळ्याच्या सालीची चटणी

- Advertisment -

Manini