Friday, April 19, 2024
घरमानिनीHealthPeriod मध्ये व्यायाम करावा की नाही?

Period मध्ये व्यायाम करावा की नाही?

Subscribe

आजकाल पीरियड्स दरम्यान महिला आपल्या फिटनेस रुटीनला ब्रेक देत नाहीत. या दरम्यान कमी इंटेंसिटी असणारा व्यायाम किंवा योगा करु शकता. परंतु काही फिटनेस फ्रिक महिला अशा आहेत ज्या पीरियड्सच्या वेळी सुद्धा इंटेस वर्कआउट करतात. पीरियड्स दरम्यान किती वेळ व्यायाम करावा हे प्रत्येक महिलेच्या व्यक्तिगत शारिरीक क्षमतेवर निर्भर करते. परंतु बॉडीचे काही फंक्शन्स असे असतात जे एक समान रुपात काम करते. अशातच त्या सोबत कोणतीही छेडछाड करणे आरोग्यावर भारी पडू शकते.

पीरियड्स दरम्यान व्यायाम करणे चुकीचे नाही. परंतु इंटेस एक्सरसाइजच्या कारणास्वत तुमचे पीरियड्स फ्लो आणि टाइमिंगवर परिणाम पडू शकतो. यामुळे हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे की, पीरियड्स दरम्यान व्यायाम करणे किती योग्य आहे.

- Advertisement -

तज्ञ असे म्हणतात की, पीरियड्स दरम्यान इंटेस व्यायाम करणे काही महिलांसाठी सुरक्षित असते. परंतु सर्वच महिलांच्या बाबतीत असे होईल असे नव्हे. प्रत्येक महिलेची मेंस्ट्रुअल सायकल वेगळी असते. वय, आरोग्य आणि फिटनेसचा स्तर अशा सर्व गोष्टी मेंस्ट्रुअल सायकलवर प्रभाव पाडतो. याच कारणस्तव पीरियड्स दरम्यान इंटेस व्यायाम करणे काही महिलांसाठी सुरक्षित आहे तर काहींसाठी नाही. पीरियड्समध्ये एक्सरसाइज करण्यापू्र्वी पहा की, तुमचे शरिर यासाठी सक्षम आहे की नाही.

- Advertisement -

सर्वसामान्यपणे मासिक पाळीदरम्यान, हलक्या स्वरुपाची एक्सरसाइज करावी. यामुळे क्रॅम्पस कमी येणे, मूड सुधारणे आणि तणाव कमी करण्यास मदत होते. परंतु ज्या महिलांमध्ये पीरियड्स दरम्यान अधिक ब्लिडिंग होते किंवा अधिक दुखते त्यांनी कधीच इंटेस वर्कआउट करु नये. जेव्हा महिला पीरियड्समध्ये हाय इंटेसिंटी वर्कआउट करतात तेव्हा त्यांचे हार्मोन्स हे असंतुलित होऊ लागतात.

तर पीरियड्स दरम्यान शारीरिक क्षमतेसह डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम करावा. खासकरुन जर मेंस्ट्रुअल सायकलमध्ये कोणतीही समस्या असेल तर डॉक्टरांना विचारा.


हेही वाचा- Vagina च्या येथे साबण वापरणे ठरु शकते धोकादायक

- Advertisment -

Manini