Tuesday, April 16, 2024
घरमानिनीकडक उन्हात व्यायाम कसा करावा?

कडक उन्हात व्यायाम कसा करावा?

Subscribe

ऋतू कोणताही असो व्यायाम करणे आरोग्यासाठी फार गरेजेचे असते. व्यायाम तुम्हाला मानसिक आणि शारिरीक रुपात तंदुरुस्त राहण्यास मदत करतो. परंतु उन्हाळ्यात वातावरणातील तापमान ऐवढे वाढलेले असते की, लोक घराबाहेर पडण्याऐवजी घरीच थांबण्याचा पर्याय निवडतात. अशातच बहुतांश लोक सुद्धा व्यायाम करण्यासाठी ही कंटाळा करतात. कारण तापमान वाढण्यासह फिजिकल अॅक्टिव्हिटी केल्याने ब्लड सर्कुलेशन अधिक वेगाने वाढते. अशातच जाणून घेऊयात उन्हाळ्यात व्यायाम नक्की कोणत्या वेळेत करावा याबद्दलच अधिक.

उन्हाळ्यात व्यायाम करण्यासाठीची योग्य वेळ
उन्हाळ्यात व्यायाम करण्यासाठी अशा वेळीची निवड करावी जेव्हा तामपान अधिक गरम नसेल. त्यामुळे पहाटे ४ ते ७ वाजताच्या दरम्यान दिवस आणि रात्रीच्या तुलनेत कमी असते. याच वेळेदरम्यान तुम्ही पहाटे ५ ते ७ दरम्यान व्यायाम केला पाहिजे. यामधील सर्वाधिक बेस्ट टाइम सकाळी ५.३० ते ६.३० आहे. यावेळीआधी सुर्योदय हा ५ वाजताच होते आणि दोन तासांनी वातावरणाचे तापमान वाढू लागते. अशातच व्यायाम करणे थोडे मुश्किल होते.

- Advertisement -

उन्हाळ्यात व्यायाम करताना अशी घ्या काळजी
-उन्हाळ्यात व्यायाम करतेवेळी सर्वाधिक प्रथम हे लक्षात ठेवा की, सैल कपडे घाला
-व्यायामापूर्वी खुप पाणी प्या
-व्यायामादरम्यान पाण्याची एक बॉटल तुमच्यासोबत ठएवा
-सनस्क्रिन लावा आणि नंतरच व्यायाम करा
-व्यायामादरम्यान ओला टॉवेल ही ठेवा

- Advertisement -

या व्यतिरिक्त हे सुद्धा लक्षात ठेवा की, व्यायाम तेवढाच करा जेवढा तुम्हाला झेपेल. परंतु तुम्हाला तो करताना समस्या येत असेल तर करु नका. अथवा हलक्या स्वरुपाचा व्यायाम करा.

 


हेही वाचा: Heat Stroke Symptoms: उष्माघात काय आहे? या मागची कारणे काय ? आणि कशी घ्याल काळजी जाणून घ्या

- Advertisment -

Manini