Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health World Brain Tumor Day: स्मरणशक्ती कमी होणे आणि झोपेत बदल असू शकतात...

World Brain Tumor Day: स्मरणशक्ती कमी होणे आणि झोपेत बदल असू शकतात ब्रेन ट्यूमरचे संकेत

Subscribe

आपला मेंदू 24 तास सातत्याने काम करत असतो. कामादरम्यान आपला मेंदू कधीकधी ब्रेनच्या खास हेल्थ संबंधित समस्येचा सामना करतो. ब्रेन ट्युमर सुद्धा त्यापैकीच एक आहे. परंतु जेव्हा ब्रेन ट्युमर डेवलप होत असतो तेव्हा त्याचे संकेत शरिराला मिळण्यास सुरुवात होते. व्यक्तींना त्याची लक्षण दिसून येतात. तज्ञ असे सांगतात की, वेळीच याचे संकेत ओळखून उपचार केल्यास तो बरा होऊ शकतो. ब्रेन ट्युमरच्या प्रति लोकांना जागृ करण्यासाठीच 8 जूनला वर्ल्ड ब्रेन ट्युमर डे असे साजरा केला जातो.(World Brain Tumor Day)

वर्ल्ड ब्रेन ट्युमर डे पहिल्यांदा 2000 मध्ये जर्मनी मधील एक एनजीओ संघटना जर्मन ब्रेन ट्युमर असोसिएशनच्या द्वारे साजरा केला गेला. यंदाच्या वर्षीची थीम ही What is better safe than tumor असा आहे.

- Advertisement -

ब्रेन ट्युमर मेंदूमध्ये किंवा त्याच्या कोशिकांमध्ये वृद्धि होते. ब्रेन ट्युमर ब्रेन टिश्यू मध्ये होऊ शकते. तो ब्रेन टिश्यूजवळ सुद्धा असू शकते. आसपास म्हणजेच नर्व, पिट्युरी ग्लँन्ड, पीनियल ग्लँन्ड आणि ब्रेनवरील पडद्यावर ही होऊ शकतो.

- Advertisement -

कसे कळते?
तज्ञ असे सांगतात की, ट्युमर झाल्यानंतर तो कळतो. अथवा कधीकधी ब्रेन ट्युमर झालेल्या लोकांना काही संकेत मिळतात किंवा एखादे लक्षण, संकेताचे कारण दुसऱ्या वैद्यकिय स्थितीचे असू शकतात. तो ब्रेन ट्युमर ही असू शकतो. सामान्य लक्षणांमध्ये मेंदू किंवा पाठीच्या कण्यावर त्याचा दबाव निर्माण होऊ शकतो. जेव्हा ट्युमरच्या कारणास्तव मेंदूचा एक विशिष्ट भाग व्यवस्थितीत कार्य करत नाही तेव्हा लक्षण अधिक गंभीर असू शकतात.

ब्रेन ट्युमरची सामान्य लक्षणं
ब्रेन ट्युमरची सामान्य लक्षणं अशी की, खुप डोकं दुखते. ही समस्या सकाळच्या वेळेस खुप वाढते. यावर काही औषधांनी ते नियंत्रित केली जाऊ शकते. या व्यतिरिक्त मळमळणे किंवा उलटी होण्यासह स्मरणशक्ती कमी सुद्धा होऊ शकते.

काही गंभीर लक्षणं होऊ शकतात
सेरिबॅलम मध्ये ट्युमर झाल्यास शरिराचा समतोल राखण्यास समस्या येतात. मोटर स्किल सुद्धा प्रभावित होते. सेरेब्रमच्या फ्रंटल लोबमध्ये ट्युमर झाल्यास निर्णय घेण्यास फार समस्या उद्भवतात. नेहमीच सुस्ती आल्यासारखे वाटते, स्नायू दुखतात. (World Brain Tumor Day)

ओसीसीपिटल लोब किंवा सेरेब्रमच्या टेम्पोरल लोब मध्ये ट्युमरमुळे दिसणे आंशिक किंवा पूर्णपणे समस्या येऊ शकते. ब्रेनच्या टेम्पोरल लोब मध्ये ट्युमरच्या भावनात्मक स्थितीत परिवर्त जसे की, आक्रमता आणि शब्द बोलण्यास किंवा समजण्यास समस्या येऊ शकते.


हेही वाचा- स्ट्रेस हार्मोन कोर्टीसोल कमी करण्याचे ‘हे’ तीन उपाय

- Advertisment -

Manini