घरलाईफस्टाईलWorld Diabetes Day 2021: डायबिटीजमुळे या हेल्थी पदार्थांचाही शरीरावर होतो दुष्परिणाम

World Diabetes Day 2021: डायबिटीजमुळे या हेल्थी पदार्थांचाही शरीरावर होतो दुष्परिणाम

Subscribe

डायबिटीज म्हणजे मधुमेह . हा एक असा आजार आहे की ज्यामुळे शरीरात इन्सुलिन तयार होत नाही. यामुळे याचा थेट दुष्परिणाम दुसऱ्या अवयवांवरही होतो. तज्त्रांच्या मते जंक फूड, गोड पदार्थ, प्रोटीनयुक्त पदार्थ जसे हाय ग्लायसेमिक इंडेक्सवाल्या पदार्थाच्या सेवनामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. तसेच काही पोषक पदार्थांमधून साखर आणि कार्बोहायड्रेडचे प्रमाण वाढते. यामुळे जर तुम्हांला डायबिटीज असेल तर खाण्यापिण्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

- Advertisement -

तांदळाचे पदार्थ-तांदळात मुबलक प्रमाणात विटामिन्स, मिनरल्स आणि फायबर आढळते. पण त्याचबरोबर तांदूळ म्हणजे भातात कार्बोहायड्रेटसचे प्रमाणही सर्वाधिक असते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. यामुळे रुग्णांनी साधा तांदळापेक्षा ब्राऊन राईस खाण्यास हरकत नाही.

- Advertisement -

केळी-केळ्यामध्ये पोटॅशियम, विटामिन बी६, फायबर, मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते. पण त्याचबरोबर केळ्यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाणही अधिक असते. कच्च्या केळ्याच्या तुलनेत पिकलेल्या केळ्यात १६ टक्क्यांनी अधिक साखर असते. जी डायबिटीज रुग्णांसाठी नुकसानकारक आहे.

Fruit juice ingredients

फळांचा ज्यूस-बाजारात मिळणाऱ्या फळांच्या ज्यूसमध्ये फायबर आणि न्यूट्रीअंटसचे प्रमाण कमी असते. तसेच त्यात गोडपणा आणण्यासाठी साखरही टाकली जाते. यामुळे हे ज्यूस पिल्यास शऱीरात कार्बोहाय़ड्रेटचे प्रमाण वाढते.यामुळे ज्यूस पेक्षा फळ खाणं उत्तम.

कॉफी–थकवा घालवण्याबरोबरच मूड फ्रेश करण्यासाठी चहा किंवा कॉफीचे सेवन केले जाते. तसेच कामात एकाग्रता वाढवण्याचे कामही कॉफी करते. पण जर त्यात साखर किंवा साखरेचे क्युब टाकले तर त्यामुळे साखरेचे प्रमाणही वाढते.

फ्लेवर्ड ओट्स-साधे ओट्स खाणे कधीही चांगले. ओट्समध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. डायबिटीज कंट्रोल करण्याचे काम ओट्स करते. पण सध्या बाजारात मिळणाऱ्या ओट्समध्ये चवीसाठी अनेक रसायने मिळवली जातात. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.

मध-डायबिटीज रुग्णांसाठी मध हा साखरेला उत्तम पर्याय असल्याचे समजले जाते. पण कधी कधी यातील साखरेच्या अतिरिक्त प्रमाणामुळे डायबिटीज रुग्णांना तक्रारी उद्धवू शकतात.

प्रोटीन बार-वर्कआऊटच्या आधी आणि नंतर अनेकजण प्रोटीन बार खातात. प्रोटीन बार शरीरात उर्जा मिळते तसेच स्नायूही मजबूत होतात. पण यात कॅलरीज, साखरेचे प्रमाण अधिक असते.

सुका मेवा-बेदाणे, काजू, बदाम, आक्रोड, अंजीर यांचे अतिसेवनामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे सुका मेवा प्रमाणात खावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -