घरताज्या घडामोडीWorld Food Safety Day 2021: कोरोना काळात बाहेरचं खाणं असुरक्षित; शरीरावर होतायंत...

World Food Safety Day 2021: कोरोना काळात बाहेरचं खाणं असुरक्षित; शरीरावर होतायंत गंभीर परिणाम

Subscribe

प्रत्येकाला बाहेरचं खाणं खूप आवडत. तोंडाची चव बदलण्यासाठीचे कारण सांगून आपणं बाहेरचं खाणं खात असतो. अनेकांना बाहेरच्या खाण्याची खूप सवय असते. परंतु कोरोनाच्या काळात बाहेरचं खाणं असुरक्षित आहे. या दिवसात बाहेरचं खाणं टाळण्यास तज्ज्ञांनी सांगितले आहे. आठवड्यातून एकदा, दोनदा बाहेरचं खाणं यात काही वाईट नाही. परंतु जर तुम्ही दररोज फास्ट फूड खाण्याची सवय केली आहे, तर त्याचे तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

Food Institute Analysis of Data from the Bureau of Labor Statistics नुसार, लोकं आपल्या खाण्याच्या बजेटमधील ४५ टक्के रेस्टोरंटच्या खाण्यावर खर्च करतात. यामुळे आरोग्यसंबंधीत आजार वाढतात. आज वर्ल्ड फूड सेफ्टी डे आहे. त्यानिमित्ताने आज आम्ही तुम्हाला बाहेरचं खाण्याचा शरीरावर कसा परिणाम होतो, हे सांगणार आहोत.

- Advertisement -

फास्ट फूडमुळे वाढला लठ्ठपणा

सर्वजण फास्ट फूड प्रेमी आहेत. खास करून तरुणी मंडळींची पहिली आवड फास्ट फूड आहे. परंतु दररोज सेवन केल्यामुळे कमी वयात लठ्ठपणा वाढत आहे. आज संयुक्त राष्ट्र अमेरिकेत ३ पैकी २ पेक्षा अधिक व्यक्ती लठ्ठपणाने ग्रस्त आहेत. ६ ते १९ वयोगटातील एक तृतीयांश मुलांचे वजन वाढले आहे. Center for Disease Control and Prevention मध्ये छापलेल्या अभ्यासात आढळले आहे की, फास्ट फूडमध्ये कॅलरीज, फॅट्स आणि सोडियमचे प्रमाण जास्त असते.

- Advertisement -

साखर शरीरासाठी हानीकारण

काही फास्ट फूड्समध्ये साखर मिसळली जाते, जे शरीरासाठी फायदेशीर नसते. merican Heart Association दररोज फक्त १०० ते १५० कॅलरी अतिरिक्त साखर सेवन करण्याचा सल्ला देते. याचा अर्थ सहा ते नऊ चमचे. त्यामुळे ट्रान्सफॅट असलेले कोणतेही खाद्य पदार्थ आरोग्यासाठी चांगले आणि आरोग्यदायी नसते.

डायबिटीज वाढण्याची शक्यता

फास्ट फूडमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते. अशा पदार्थांमुळे पचनसंस्था बिघडते आणि शुगर लेव्हल वाढवते. यामुळे टाईप-२ डायबिटीज आणि वजन वाढण्याची शक्यता असते.

दातांची समस्या उद्भवते

फास्ट फूडमुळे दातांच्या समस्या उद्भवतात. फास्ट फूडमध्ये असलेले काब्र्स आणि सारख सारखे अॅसिड निर्माण करते, जे इनेमलला नष्ट करते. यामुळे दाताला कीट लागण्याची समस्या निर्माण होते.

श्वसनावर होतो परिणाम

फास्ट फूडमधील कॅलरी वजन वाढण्याचे महत्त्वाचे कारण आहे. लठ्ठपणा अस्थमा आणि श्वास घेण्याच्या समस्येत वाढ करते. BMJ Journalsमध्ये छापलेल्या अध्ययनानुसार, जी मुलं आठवड्यातून तीन वेळा फास्ट फूडचे सेवन करतात, त्यांना अस्थमा सारखा आजार लवकर होतो.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -