World Milk Day 2022 : दुधासोबत ‘या’ 5 गोष्टींचे चुकून ही करू नका सेवन

1 जून रोजी संपूर्ण जगभरात ‘वर्ल्ड मिल्क डे’(World Milk Day 2022) साजरा केला जातो. लोकांना दूधाचे महत्त्व सांगण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. दूधात प्रत्येक प्रकारचे पोषक तत्वांचा समावेश असतो आणि ते आरोग्यासाठी देखील फायदेशीर असते. मात्र अनेकजण दूध वेगवेगळ्या पद्धतीने पितात. काहींना साधे दूध प्यायला आवडते, तर काहीजण दूधाबरोबर दुसरा वेगळा पदार्थ पिणं सुद्धा पसंत करतात. हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, दूधासोबत काही पदार्थांचे सेवन केल्यास शरिरासाठी घातक परिणाम भोगावे लागू शकतात.

या ५ गोष्टींचे कधीही करू नका दुधासोबत सेवन

 • मासे आणि दूध
  दूधमध्ये थंडपणा असतो आणि मासे खाल्याने शरिराचे तापमान वाढते. या दोन्हीच्या एकत्रीत सेवनाने शरिराच्या तापमानात असंतुलन निर्माण होते.
 • दूध आणि केळी
  अनेकजण दूधासोबत केळ्याचे सेवन करतात. मात्र या दोन्हीचे एकत्र सेवन केल्यास ते पचवायचे सोप्पे जात नाही. ज्यामुळे पोट दूखीचा त्रास निर्माण होऊ शकतो.
 • फळांसोबत दूध
  कधीही फळांसोबत दूधाचे सेवन करू नये. कारण हे शरिरासाठी नुकसानदायक सिद्ध होते.
 • मूळा आणि दूध
  आर्युर्वेदानुसार मूळा खाल्यानंतर लगेच दूध पिऊ नये. कारण मूळ्यामध्ये गरमी असते. ज्यामुळे मूळ्यावर लगेच दूध पिल्यास पोटामध्ये जळजळ होऊ शकते.
 • दूधाबरोबर खारट पदार्थ
  हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते दूधासोबत कधीही खारट पदार्थांचे सेवन करू नये. असे केल्यास तुम्हाला उलटी, एलर्जीचा त्रास निर्माण होऊ शकतो.

 


हेही वाचा :http://चवीला चटपटीत आणि आरोग्यासाठी पौष्टिक मूग डाळीचा डोसा; आजच ट्राय करा….