Sunday, October 1, 2023
घर मानिनी Health World No Tobacco Day: सिगारेट, तंबाखू मुळे होऊ शकतो गर्भपात

World No Tobacco Day: सिगारेट, तंबाखू मुळे होऊ शकतो गर्भपात

Subscribe

तंबाखूमुळे कॅन्सर होतो असे वारंवार सांगितले जाते. तसेच तंबाखूचे सेवन आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे माहिती असून ही जगभरात धुम्रपान करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. यामध्ये महिला वर्गाचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे वेळीच यापासून दूर राहता आले नाही तर गंभीर परिणामांचा सामना करावा लागू शकतो. तर आज (31st May) जागतिक तंबाखू दिवस साजरा केला जात आहे. (World No Tobacco Day)

जागतिक तंबाखू दिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्देश असा की, सार्वजनिक आरोग्य, समाज आणि पर्यावरणाला तंबाखूच्या प्रोडक्ट्स पासून होणाऱ्या नुकसानीपासून जागृक करणे. 1987 मध्ये जागतिक तंबाखू निषेध दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली होती. यंदाच्या वर्षीची थीम ही We need food, not tobacco अशी ठेवण्यात आली आहे.

- Advertisement -

तंबाखूची पानं ही खाद्यपदार्थ नाहीत. तरीही त्याचा वापर काही खाद्यपदार्थांमध्ये केला जाते. तज्ञांच्या मते, तंबाखूची पानं विषारीयुक्त जोखिमीसंबंधित आहे. तर जखम झालेल्या ठिकाणी तुम्ही तंबाखूची पानं लावू शकता. यामुळे रक्तस्राव थांबवला जाऊ शकतो.

World No Tobacco Day
World No Tobacco Day

- Advertisement -

सर्वसामान्यपणे असे म्हटले जाते की, तंबाखूच्या पानांच्या माध्यमातून स्मोकिंग केल्यास आराम मिळू शकते. परंतु आयुर्वेदातील तज्ञांच्या मते. तंबाखू वास्तवात चिंता आण टेंन्शन वाढवतो. तंबाखूत अंमली पदार्थ निकोट असल्याने तो सुरक्षित नाही. याचे अधिक सेवन केल्यास चक्कर येणे, घाम येणे, डोकेदुखी किंवा बैचेन वाटत राहणे अशा समस्या उद्भवतात. (World No Tobacco Day)

या व्यतिरिक्त ज्या महिला स्मोकिंग करतात त्यांनी सुद्धा ते बंद केले पाहिजे. यामुळे गर्भाव्यवस्था दरम्यान पोटात जन्म घेणाऱ्या बाळ्याचे टिश्यूचे नुकसान होऊ शकते. विशेष रुपात फुफ्फुसं आणि मेंदूला ही नुकसान होऊ शकते. तंबाखूत असलेल्या निकोटीनच्या कारणास्तव गर्भपाताची शक्यता अधिक वाढली जाते. गर्भाव्यस्थादरम्यान धुम्रपान केल्याने गर्भपात आणि प्री-टर्म बर्थसह काही समस्यांचा धोका वाढला जातो. गर्भावस्थेदरम्यान स्मोकिंग केल्यास मुलं मोठ झाल्यानंतर अचानक मृत्यू, फुफ्फुस कमजोर असणे किंवा कमी वजन अशी जोखिम निर्माण होते. तर तंबाखूचे सेवन कोणत्याही रुपात करणे आरोग्यासाठी हानिकारकच आहे. त्यामुळे नशा म्हणून स्मोकिंग करत असाल तर त्यापासून दूर राहिले पाहिजे.


हेही वाचा- धुम्रपान करणाऱ्या महिलांनो सावधान, सेक्शुअल लाइफवर होतो थेट परिणाम

- Advertisment -

Manini