महाराष्ट्राचा प्रामुख्याने मुंबईकरांचा आवडता पदार्थ म्हणजे वडापाव. आज म्हणजेच 23 ऑगस्ट हा दिवस जागतिक वडा पाव दिवस म्हणून साजरा केला जातो. अलीकडे वडापावचे अनेक नवनवीन प्रकार आपण पाहतो. साध्या वडापावापासून ते चिज वडापावपर्यंत अनेक प्रकारचे वडापाव बनवले जातात. आज आम्ही तुम्हाला याच विविध प्रकारच्या वडापावांबाबत सांगणार आहोत.
1960 मध्ये मुंबईतील दादरमध्ये वडापावचा जन्म झाला. तेव्हापासून आजपर्यंत मुंबईकरांचा हा आवडता पदार्थ आहे. काळानुसार वडापावमध्ये विविध बदल करण्यात आले मात्र, आजही रेग्युलर वडापावची चव सर्वाधिक लोकप्रिय आहे.
रेग्युलर वडापाव
हा वडापाव पूर्वीपासून लोकप्रिय आहे. यामध्ये पावासोबत चटपटीत बटाटा वडापाव दिला जातो. यासोबत गोड किंवा तिखट चटणी आणि मिरची देखील असते.
ठेचा वडापाव
हा वडापाव तिखट खाणाऱ्या व्यक्तींना खूप आवडतो. यामध्ये तिखट चटणी ऐवजी मिरचीच्या ठेचाचा वापर केला जातो. हा वडापाव देखील चवीला उत्तम लागतो.
चीजबर्स्ट वडापाव
या वडापावमधील वड्यामध्ये चीज टाकले जाते. याची टेस्ट देखील खूप छान लागते. वडापाव सर्व्ह करताना देखील त्यावर खूप चीज टाकले जाते.
शेझवान वडापाव
या वडापावमध्ये तिखट-गोड चटणी ऐवजी शेझवान चटणीचा वापर केला जातो.
ग्रील वडापाव
या वडापावमध्ये बटर टाकून त्याला ग्रील केले जाते. हा वडापाव सध्या लोकप्रिय आहे.