महाराष्ट्राचा प्रामुख्याने मुंबईकरांचा आवडता पदार्थ म्हणजे वडापाव. आज म्हणजेच 23 ऑगस्ट हा दिवस जागतिक वडा पाव दिवस म्हणून साजरा केला जातो. अलीकडे वडापावचे अनेक नवनवीन प्रकार आपण पाहतो. छोट्या स्टॉलपासून ते मोठमोठ्या हॉटेलमध्ये देखील वडापावला मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. मुंबईमध्ये येणारा असा एकही माणूस नसेल ज्याने कधी वडापाव खाल्ला नाही. परंतु या लोकप्रिय वडापावचा जन्म नक्की कसा झाला हे आपण पाहू.
असा झाला वडा पावचा जन्म
1960 मध्ये अशोक वैद्य या गृहस्थांनी वडा पावचा शोध लावला. त्यांचा दादर स्टेशन बाहेर एक फूड स्टॉल होता. त्यावेळी बटाट्याची भाजी आणि चपाती खाण्यापेक्षा त्यांनी बटाट्याची भाजी बनवून तिला बेसन पीठामध्ये बुडवून त्याचा वडा तयार केला. आणि चपाती ऐवजी तो पावाबरोबर खाल्ला दिला जाऊ लागला.
त्याकाळात सर्वसामान्यांना परवडेल आणि पोट भरेल असा वडापाव हळूहळू प्रसिद्ध झाला. त्याकाळात 1970 ते 1980 च्या दशकात मुंबईतील गिरण्या बंद पडल्याने अनेकांनी वडापावकडे उपजीविकेचे साधन म्हणून पाहिले. दरम्यान, हळूहळू ठिकठिकाणी वडापावचे गाडे दिसू लागले. राजकीय पाठबळामुळे हळूहळू मराठी तरूण मंडळी स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करू लागले. वडापावला आता महाराष्ट्रातंच नाही तर विदेशात देखील मानचे स्थान प्राप्त झाले आहे.
हेही वाचा :