Friday, January 3, 2025
HomeमानिनीHealthWorld AIDS day 2024 : AIDS आणि HIVच्या विरूद्ध लढणारी मोहीम म्हणजे...

World AIDS day 2024 : AIDS आणि HIVच्या विरूद्ध लढणारी मोहीम म्हणजे World AIDS day

Subscribe

दरवर्षी 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे एचआयव्ही , एड्स विषयी जागरूकता निर्माण करणे आणि या गंभीर आजाराविषयी असलेले गैरसमज लोकांच्या मनातून नाहीसे करणे हा आहे. यारताच यादिवशी एड्स आणि एचआयव्हीशी संबंधित आवश्यक गोष्टींबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

वर्ल्ड एड्स डे चे महत्त्व काय ?

जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने आपल्याला एचआयव्ही, एड्स या विषयांवर जागरुकता निर्माण करण्याची संधी मिळते. एचआयव्ही संक्रमित झालेल्या रूग्णांना सहानुभूती दाखवण्याची आणि या आजाराशी लढण्यासाठी एकत्र येण्याची संधी या दिनानिमित्त मिळते.या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम , सेमिनार आणि जागरूकता अभियान यांचे आयोजन केले जाते. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात 1988 मध्ये झाली होती. जाणून घेऊयात एचआयव्ही आणि एड्सशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टींविषयी.

- Advertisement -

एचआयव्ही / एड्स काय आहे ?

एचआयव्ही हा एक असा व्हायरस आहे, जे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतात. एड्स हा एचआयव्ही संक्रमणाची सर्वात शेवटचा टप्पा आहे. जेव्हा एचआयव्ही आपल्या शरीरात प्रवेश करतो. तेव्हा हा टी-सेल्सला नाहीसा करू लागतो. टी-सेल्स शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीचा एक महत्त्वाचा भाग आहेत. जेव्हा टी-सेल्सची संख्या खूप कमी होते तेव्हा शरीरातील शरीर एखाद्या साध्या आजाराविरूद्ध लढण्यासाठीही असमर्थ होतं. ज्यामुळे व्यक्तीचा मृत्यू ओढवू शकतो.

एचआयव्ही इन्फेक्शनची लक्षणे :

एचआयव्ही इन्फेक्शनच्या सुरूवातीच्या काही टप्प्यांमध्ये आपल्याला फार लक्षणे दिसत नाहीत. काही लोकांना हलका ताप, घशात खवखव, थकवा, न्यूमोनिया ,तोंड येणे अशा समस्या जाणवतात. खरंतर ही लक्षणे काही आठवड्यांनंतर आपोआप गायबही होतात.

- Advertisement -

एड्सची लक्षणे :

जेव्हा एचआयव्ही इन्फेक्शन एड्सच्या स्टेजला पोहचते तेव्हा काही अशी लक्षणे दिसतात ती म्हणजे –

सतत येणारा ताप
विनाकारण कमी होणारे वजन
सतत येणारा थकवा
खोकला
रात्री घाम येणे
त्वचेवर चट्टे उठणे.
तोंडाचा अल्सर
नजर कमकुवत होणे
संधिवात आणि मांसपेशींमध्ये वेदना

एचआयव्हीचा प्रसार कसा होतो ?

असुरक्षित लैंगिक संबंध
एकाच इंजेक्शनचा पुन्हा पुन्हा वापर
संसर्ग झालेल्या आईकडून गर्भावस्थेतील बाळाकडे संक्रमण
ब्लड ट्रान्सफर

एड्स वर उपाययोजना काय ?

एड्सवर कोणताही ठोस उपाय नाही. परंतु अँटिरेट्रोव्हायरल औषधांच्या माध्यमातून हा आजार नियंत्रणात ठेवला जातो. या माध्यमातून रुग्णाचे आयुष्य सोपे बनवण्याचा प्रयत्न केला जातो.

हेही वाचा : Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये वाढतोय ‘फ्रेंडशिप मॅरेज’चा नवा ट्रेंड


Edited By – Tanvi Gundaye

- Advertisment -

Manini