योगासन हे आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त असून यामुळे आपल्या मनावर नियंत्रण राहते. सध्याचा काळ धावपळीचा असून अनेकांना मधुमेह, रक्तदाब यांसारख्या आजाराच्या समस्या सतावत आहेत. अनेकवेळा व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार, आहाराच्या चुकीच्या वेळा यामुळे त्यांना आरोग्यविषयक अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
तणावमुक्तीसाठी योगासने
- हलासन
हलासन करताना पाठीचा कणा ताणला जातो. तसेच त्याला लवचिकता येते. हे करत असताना कमरेपासून पायापर्यंतच्या स्नायूंवर ताण येतो. त्यामुळे शरीरातील नसांचा रक्तपुरवठा चांगला राहतो. अशातच पोटाचे स्नायू व त्यातील इंद्रिये यांची कार्यक्षमता वाढते आणि यामुळे पचन चांगले होते. तसेच हे नियमित केल्याने आरोग्य सदृढ राहते.
- मत्स्यासन
मत्स्यासनामुळे पोटाला योग्य ताण पडतो. अशातच त्यावेळी ताणलेल्या ग्रंथी मोकळ्या होतात. तसेच मेंदूला अधिक चांगल्या प्रकारे रक्तपुरवठा होतो. ज्यामुळे मेंदूला चालना मिळते. अशक्तपणा आणि चक्कर अशा समस्या येत नाहीत. शरीरातील ब्लड प्रेशर व्यवस्थित राहते. यामुळे चिडचिड होत नाही. तर हे केल्यामुळे एकाग्रता वाढते.
- भुजंगासन
या योगासनामध्ये पोटावर झोपून, हात छातीजवळ टेकून, पोटापर्यंत शरीर मागे उचलणे. मान वर उचलून मागेपर्यंत घेणे ही कृती. मुख्य संबंध पाठीच्या कण्याशी व पोटाच्या स्नायूंशी असतो. पोटाच्या स्नायूंवरील ताण हा पचनेंद्रियांवर योग्य परिणाम करतो. यामुळे पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते. पाठदुखी वा पाठीच्या कण्याच्याचुकीच्या हालचालीवर भुजंगासन केल्यास पाठीला आराम मिळतो.
- शलभासन
हे योगासन करताना या आसनातील ताण हा विशेषेकरून पाठीच्या मणक्यावर आणि ओटीपोटातील स्नायू व मांडीतील स्नायू यावर येतो. त्यामुळे त्या स्नायूंची कार्यक्षमता वाढते. तसेच हे केल्यावर लहान व मोठे आतडे यांवरही ताण पडून स्नायूंची अधिक हालचाल होते आणि यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
हेही वाचा :