केस गळती ही आजकाल सर्व वयोगटातील व्यक्तींना जाणवणारी एक सामान्य समस्या आहे. विशेष करून ही समस्या महिलांमध्ये अधिक जाणवते. अशा परिस्थितीत, तुम्ही योगा करून केसगळतीच्या समस्येपासून काही प्रमाणात दिलासा मिळवू शकता. योगासनामध्ये तुम्ही केसगळती थांबवण्यासाठी अधोमुख श्वानासन करायला हवे. अधोमुख श्वानासनातील अधो म्हणजे खाली जाणे, मुख म्हणजे तोंड आणि श्वान म्हणजे कुत्रा. हे आसन केसगळतीवर कसे फायदेशीर ठरते आणि ते कसे करायचे पाहूयात,
अधोमुख श्वानासन करण्याची पद्धत –
- सर्वात आधी योगा मॅटवर पोटावर झोपा.
- आता कंबर वरच्या दिशेला उचला. या स्थितीत तुम्हाला शरीर टेबलाच्या आकारात दिसेल.
- यानंतर गुडघे आणि हातांचे कोपर ताठ ठेवून शरिरात V आकाप द्या आणि हात जमिनीवर ठेवा.
- या स्थितीत आल्यावर तुमच्या नाभीकडे पाहा.
- जवळपास 1 मिनिटे तरी या स्थितीतच राहा.
- 1 मिनिटांनंतर पुन्हा पूर्वपदावर या.
- हे आसन करताना तुमचे नितंब उआणि ताळ
अधोमुख श्वानासनाचे फायदे –
- अधोमुख श्वानासन केल्याने डोक्याच्या दिशेने रक्तप्रवाह वाढतो, ज्यामुळे केसांच्या मुळांना ऑक्सिजन आणि पोषण मिळते. ऑक्सिजनच्या पुरवठ्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि केसगळती होत नाही.
- या आसनाच्या मदतीने टाळूचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. त्यामुळे तुम्हाला जर टाळूशी संबधित काही समस्या असतील तर दररोज दिवसातील काही वेळ अधोमुख श्वानासन जरूर करा, नक्कीच फायदा होईल.
- अधोमुख श्वानासन केल्याने मानसिक शांती मिळण्यास मदत होते. कारण बदलत्या जीवनशैलीमुळे हल्ली बरेच जण ताणतणावाच्या समस्येशी झुंज देत आहेत. वाढत्या ताणतणावामुळे केवळ मानसिक आरोग्यावरच नाही तर केसांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही मानसिक शांतीसाठी आणि केसगळती थांबवण्यासाठी हे आसन करायला हवे.
- तज्ञांच्या म्हणण्यानूसार, या आसनासोबत संतुलित आहारही घ्यायला हवा. तसेच पूर्ण झोपही महत्त्वाची आहे. संपूर्ण आहार आणि पूर्ण झोप केसांच्या आरोग्यासह संपूर्ण आरोग्य उत्तम राखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते.
त्यामुळे केसगळतीच्या समस्येपासून सुटका होण्यासाठी दिवसातील केवळ 10 मिनिटे काढून अधोमुख श्वानासनाचा सराव अवश्य करावा.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde